बुलढाणा बस अपघात : २६ लोकांचा जीव गेला तरी, शेख इस्माईल खोटे बोलत राहिला!

    02-Jul-2023
Total Views | 3144
Buldhana Accident

बुलढाणा 
: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताबाबत पोलिसांची दिशाभूल केल्याचा आणि टायर फुटल्याचे खोटे बोलल्याचा दानिशवर आरोप आहे. दरम्यान पोलीसांनी दानिश शेख इस्माईल याला अटक करून ताब्यात घेतले. त्याच्यावर आयपीसीचे कलम ३०४ आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १३४,१८४ आणि २७९ लावण्यात आले आहेत.

या अपघातातून बचावलेल्यांपैकी एकाने सांगितले की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची उजवी बाजू स्टीलच्या खांबाला धडकली. त्याचवेळी खांब आणि दुभाजकाला धडकून बस उलटल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी बसच्या पुढच्या बाजूला असलेले लोक बसच्या बाहेरच्या दरवाजातून लगेच निघून गेले. मात्र त्यानंतर काही वेळातच बसला आग लागल्याने काही लोक खिडकी तोडूनही बाहेर आले. यामुळे ८ जणांचे प्राण वाचले. मात्र बाहेर पडू न शकल्याने बसमधील २५-२६ जण जणांचा जळून मृत्यू झाला.
 
अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर चालकाने टायर फुटल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले. घटनास्थळावरून रबराचे तुकडे मिळालेले नाहीत. लोकांनी दिलेल्या माहितीवरून हा अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे दिसते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा पोलिसांना संशय आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार या अपघाताबाबत कठोर पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

दि. १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सची बस ३३ जणांना घेऊन नागपूरहून पुण्याकडे दुपारी ४ वाजता निघाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा बसस्थानकावर ही बस थांबली. त्यानंतरच हा अपघात झाला. चालक आणि क्लिनरसह आठ जण कसेतरी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र बसला आग लागल्याने २५ जणांना जीव गमवावा लागला. पोलिसांनी जळालेले मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठवले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121