मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे. विधिमंडळानं निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे.त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आलं आहे. गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना बाजू मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्ष संधी देणार आहेत. "आम्हीच शिवसेना म्हणणाऱ्या" दोन्ही गटांना पुरावे सादर करावे लागणार. गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलट तपासणीही घेणार. खरी शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्ष सुरुवातीला निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते आहे.