पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुक मनसेचे नेते वसंत मोरे लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण वसंत मोरे यांनी पुणे लोसकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक शंभर टक्के लढेल आणि विजयीही होऊ, असा दावा मोरे यांनी केला आहे.
दरम्यान काँग्रेसनेही ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. तर राष्ट्रवादीने पुण्यावर दावा सांगितलेला आहे. त्यामुळे मोरेंच्या विधानाला आता महत्त्व प्राप्त झालंय.