उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा खर्च कोविड भ्रष्टाचारातून!

आमदार नितेश राणेंचा थेट आरोप, राऊतांचेही कान उपटले

    05-Jun-2023
Total Views |
Nitesh Rane on Uddhav Thackeray

मुंबई
: खासदार संजय राऊतांनी ओडीशा अपघातानंतर रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोविड काळात उद्धव ठाकरेंच्या निष्काळजी पणामुळे मृत्यू झाले तेव्हा ठाकरेंना पश्चाताप झाला होता का ? , असा सवाल राणेंनी केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा खर्च हा कोविड काळातील भ्रष्टाचारातून उभा केल्याचा आरोप नितेश राणेंनी केले आहे.

दरम्यान सामना या वृत्तपत्राचा व्यावसाय हा राज्य सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या जाहिरातीतून होता. त्यामुळे ठाकरे गट हा सरकारी तुकड्यावर जगणारा गट आहे. तसेच आदर्श रेल्वे मंत्री कसा असावा ह्याचा उत्तम उदाहरण म्हणजे आश्विनी वैष्णव आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी करून राजीनामा मागणाऱ्या राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली लायकी ओळखून बोलावे, असे ही राणे म्हणाले.