समुद्रकिनार्‍यावर सुटकेसमध्ये सापडला मुलीचा शीर छाटलेला मृतदेह, हातावर डमरू-त्रिशूलचा टॅटू!

    03-Jun-2023
Total Views | 538
headless-dead-body-of-women-found-inside-a-suitcase-at-mumbai

मुंबई : मुंबईतील मीरा -भाईंदर परिसरात दि. २ जून रोजी एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह सुटकेसमध्ये सापडला. या मृतदेहानुसार २५ ते ३५ वर्ष वय असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेहाच्या एका हातावर त्रिशूल आणि डमरू गोंदवले आहे तर दुसऱ्या हातात कलाव (रक्षा सूत्र) बांधलेले आहे. मृतदेहाचे दोन्ही पाय एकत्र बांधलेले आढळले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पीडितेच्या ओळखीसह संपूर्ण प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

मुंबईतील उत्तन सागरी भागात महिलेचा मृतदेह सापडला आहे. समुद्रकिनाऱ्यावर अल्फा ब्रँडच्या सुटकेसमध्ये तो टाकण्यात आला होता. दि. २ जून रोजी सकाळी ८ वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीने ही सुटकेस पाहिली आणि संशय आल्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध कलम ३०२ खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलम २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मुलीच्या मृतदेहाजवळ कोणतीही कागदपत्रे सापडलेली नाहीत. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी मुंबईतीलच आणखी एका घटनेत वाशिमजवळ एका पोत्यात शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. तेव्हा प्राथमिक चौकशीत पोलिसांची दिशाभूल केल्यानंतर मुख्तार खानने आपली मुलगी रईसाची हत्या केल्याची कबुली दिली होती.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121