आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष : यश आणि अपेक्षा...

    03-Jun-2023
Total Views | 711
international

अशासकीय व सामजिक संस्था यांच्या माध्यमातून मिलेट लागवड, उत्पादन वाढ व नियमित सेवन यासाठी विविध कार्यक्रम सातत्याने घेणे आवश्यक ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३‘ साजरे करत असताना त्यातून झालेले सकारात्मक बदल नक्कीच स्वागतार्ह आहेत. परंतु, हे बदल टिकवण्यासाठी सातत्याने होणार्‍या प्रयत्नांची आवश्यकता अजून काही वर्षे तरी नक्कीच आहे.

छीतकुल हे हिमाचल प्रदेशातील भारताचे शेवटचे गाव. आकर्षक निसर्ग, वाहती नदी आणि उन्हाळ्यात पेरली जाणारी शेते, तेही पारंपरिक पद्धतीने. समुद्रसपाटीपासून ११ हजार, ३२० फूट उंचीवर, अतिथंड प्रदेशात राहणारे मनसुख सध्या इथल्या पारंपरिक मिलेट आहाराकडे वळले आहेत. ‘फाफरा‘ आणि ‘ओगला‘ हे दोन्हीही दुर्मीळ धान्य, या भागात अगदी पूर्वापार उगवले जात असे. मध्यंतरी गहू व भात दैनंदिन आहारात लोकप्रिय बनले आणि जुन्या धान्यांची लागवडदेखील थांबली. मधुमेहासारखा आजार मोठ्या प्रमाणात या भागात बळावला. मनसुख यांना तर ‘इन्सुलिन’ घ्यावे लागले. त्यानंतर त्यांनी ‘फाफरा‘ हे मिलेट धान्य आपल्या आहारात समाविष्ट केले. या धान्यांच्या सेवनाने मधुमेह आटोक्यात ठेवता येतो, हे त्यांना माहीत होते. शिवाय, इथल्या उंच, थंड प्रदेशात हे धान्य उत्तम पिकते व भरपूर उत्पन्न देते. त्यामुळे साठवून ठेवलेले धान्य वेळप्रसंगी उपयोगी पडते.

हिमाचलसारख्या थंड वाळवंटात जसे मिलेट उगवते, तसेच तेे महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेशसारख्या उष्ण प्रदेशातदेखील उगवते. राजस्थानसारख्या कमी पर्जन्य भागात उगवते तसेच कोकण व सह्याद्रीच्या अति पर्जन्यमान असलेल्या प्रदेशातदेखील उगवते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच हवा, पाणी, माती याच्याशी समायोजन करून या धान्यांची तग धरण्याची क्षमता पाहिली, तर जगभरातील तापमान वाढीच्या समस्येवर ‘मिलेट शेती‘ हा एक उत्तम पर्याय आहे. गरिबीमुळे असलेले कुपोषण व बदलत्या शहरी जीवनशैलीमुळे उद्भवलेले कुपोषण, या दोन्हीसाठी मिलेट धान्य हा एक उत्तम पर्याय आहे, हेही आता आपणास समजले असेल. वर्ष २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष‘ म्हणून साजरे केले जात असताना, आपण या वर्षाच्या मध्यावर येऊन ठेपलो आहोत. यानिमित्ताने जगभरात आणि भारतातदेखील अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. या विसरल्या गेलेल्या पौष्टिक धान्यांचा आहारात पुन्हा समावेश व्हावा, परंपरेने जे छोटे शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत, त्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळावा व भविष्यात अन्नसुरक्षेत भरडधान्यांचे महत्त्व याकडे जगभरचे लक्ष वेधीत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

भारत देशात कोरडवाहू व भूअल्पधारक डोंगरभागात शेती करणारे वनवासी शेतकरी यांनी प्रामुख्याने या धान्यशेतीला प्राधान्य दिलेले आहे. विशिष्ट भौगोलिकतेमुळे त्या त्या हवामानानुसार मिलेटच्या अनेक जाती भागानुसार विकसित व संवर्धित झाल्या आहेत. त्यामुळेच भरडधान्यांची मोठी विविधता भारतभर पाहावयास मिळते. शिवाय, भारत हा जगभरात मिलेट पिकवणारा एक महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे ही निश्चितच भारतासाठी मोठी संधी आहे.

मिलेट किंवा पौष्टिक तृणधान्य या वर्गात गहू व भात सोडून अनेक पौष्टिक भरडधान्य येतात. ज्वारी व बाजरी यांना मोठे भरडधान्य तर इतर नाचणी, वरई, सावां, बर्टी, राळा, कोदो यांना ‘बारीक भरडधान्य‘ असे म्हणतात. ग्लुटेनमुक्त असलेले हे धान्य पोषणाचा खजिना आहे. शिवाय ही कटक धान्ये हलक्या जमिनीतदेखील विशेष खते न वापरतादेखील घेता येतात. शिवाय यांच्या वाढीसाठी खूप कमी पाणी लागते. त्यामुळे अशा गुणी धान्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे व ते इतरांना पटवून देण्यासाठी अनेक कार्यक्रम शासकीय, अशासकीय पातळीवर देशभरात राबविले जात आहे. त्यापैकी काही ठळक म्हणजे, १. INSIMP (Initiative for Nutritional Security through Intensive Millet Promotion), २. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च‘ (IIMR), ३. ‘ओडिशा मिलेट मिशन‘ - २०१७-१८, ४. ‘छत्तीसगढ मिलेट मिशन‘, ‘महाराष्ट्र मिलेट मिशन‘, ‘कर्नाटक सेंद्रिय शेती धोरण‘, ‘आंध्र प्रदेश मिलेट मिशन‘ असे कार्यक्रम आखले गेले आहेत. ५. ‘महाराष्ट्रात मिलेट मिशन‘अंतर्गत मिलेट प्रचार-प्रसारासाठी विविध पातळ्यांवर शासकीय कार्यक्रम आखले जात आहेत. ज्वारी, बाजरीबरोबरच इतर सूक्ष्म भरडधान्यांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच, मिलेट प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.

या कार्यक्रमांचा सकारात्मक परिणाम आजूबाजूला पाहावयास मिळत आहे. जसे की, मिलेट आहाराविषयी जागरुकता निर्माण होऊन अनेकांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर इत्यादींना आहारात समाविष्ट केले आहे. मिलेट मूल्यवर्धित अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध होत आहेत. अनेक प्रक्रियाउद्योग यानिमित्ताने सुरू झाले आहेत. अनेकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली आहे. हे सर्व घडत असले तरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. २०२३ निमित्त सुरू झालेली मिलेटबद्दलची ही जागरूकता, प्रचार व प्रसार इथेच थांबवून चालणार नाही. अजूनही अनेक प्रश्न शिल्लक आहेत व ते सोडवण्यासाठी शाश्वत प्रयत्नांची आवश्यकता सातत्याने शासकीय व अशासकीय पातळीवर होणे गरजेचे आहे.

१. ज्वारी, बाजरी सोडले, तर इतर भरडधान्य घेणारे लघु विशेषतः वनवासी शेतकरी आहेत, हे लक्षात घेऊन सध्या त्यांची असलेली शेतीपद्धतीचा अभ्यास करून त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी शाश्वत सेंद्रिय/नैसर्गिक तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. २. मिलेटसाठी बाजारपेठ उपलब्धता मोठ्या प्रमाणात व सातत्याने होण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मिलेट कॅफे, मिलेट रेस्तरॉ, मिलेट महोत्सव अशा माध्यमातून मिलेट खाद्यपदार्थांची विक्री व आवड वाढू शकेल. त्यासाठी शासकीय प्रयत्न होणेच आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गट, शेतकरी संस्था यांना आर्थिक साहाय्य करून असे लघु उद्योग वाढवता येतील. ३. मिलेट प्रक्रिया व तंत्रज्ञान यात असणारे अडथळे लक्षात घेऊन ते जितके सुलभ करता येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. कारण, सध्या उपलब्ध असलेल्या मशीन्सद्वारे धान्याचा उतारा कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे मिलेटचे दर ग्राहकांना तुलनेने जास्त वाटतात. योग्य प्रमाणात उतारा यावा व कमीतकमी वाया जावे, यासाठी तसे कमी खर्चात उपलब्ध असणार्‍या मशिनरी तयार होणे आवश्यक आहे. ४. मिलेट सातत्याने आहारात असावेत, यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था, पोषण आहार यासारख्या माध्यमातून मिलेट आहाराची सवय नियमित करता येईल. ५. अशासकीय व सामजिक संस्था यांच्या माध्यमातून मिलेट लागवड, उत्पादन वाढ व नियमित सेवन यासाठी विविध कार्यक्रम सातत्याने घेणे आवश्यक ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३‘ साजरे करत असताना त्यातून झालेले सकारात्मक बदल नक्कीच स्वागतार्ह आहेत. परंतु, हे बदल टिकवण्यासाठी सातत्याने होणार्‍या प्रयत्नांची आवश्यकता अजून काही वर्षे तरी नक्कीच आहे.

मिलेटचे जतन व संवर्धन होणे ही भविष्याची गरज आहे. आज निकृष्ट व रसायनयुक्त आहारामुळे मानवी आरोग्याबरोबरच निसर्गाचीदेखील अतोनात हानी झालेली आहे. नदी, माती, हवा इतकेच काय तर भूगर्भातील पाणी देखील आम्ही प्रदूषित केले आहे. त्याचे परिणाम मानवी शरीर अनेक आजारांनी ग्रस्त झालेले दिसते. शेतकरी सातत्याने नुकसान सहन करत आहे व निसर्गापुढे हतबल झाला आहे. अशावेळी शाश्वत व सुरक्षित उत्पन्न देणारे देशी बियाणे, पौष्टिक मिलेट हेच जगाची भूक मिटवू शकतील. हे लक्षात घेऊन जाणत्या पूर्वजांचे शहाणपण समजून घेणे अत्यावश्यक आहे. आजच्या पर्यावरण दिनी शाश्वत अन्ननिर्मितीसाठी मिलेटची लागवड व निरोगी पर्यावरणासाठी मिलेटचे भोजन याला महत्त्व देऊया.
नीलिमा जोरवर

९४२३७८५४३६
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121