हिरवे हिरवे गार गालिचे...

    03-Jun-2023
Total Views | 106
Article on Grasslands


पहिल्या पावसाच्या सरींनी अंकुरणारे गवत, त्यावर डौल धरणारी रानफुले, काही पक्ष्यांचा किलबिलाट आणि इतर छोट्या मोठ्या प्राण्यांच्या अधिवासाने सजलेले गवताळ प्रदेश... सामान्यतः पडीक जमीन किंवा गायरान जमीन या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिलेल्या या भूप्रदेशांवर अनेक प्रजातींचा अधिवास अवलंबून आहे. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी 24 टक्के क्षेत्र हे एकट्या गवताळ प्रदेशाने आच्छादलेले आहे. अशा या इंग्रजीत मग्रासलॅण्ड्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काहीशा दुर्लक्षित भूप्रदेशातील जैवविविधतेचे जग उलगडणारा हा लेख...


'इंग्रजीत मग्रासलॅण्ड्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या परिसंस्थेचे उष्ण कटिबंधातील आणि समशीतोष्ण कटिबंधातील असे दोन प्रकार आढळतात.जंगलातील झाडांची ’अबव्ह लॅण्ड’ म्हणजेच जमिनीच्यावर कार्बन शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, तर याउलट गवताळ प्रदेशांचा विचार केल्यास, त्यांची ’बिलो लॅण्ड’ म्हणजेच जमिनीखालील कार्बन शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. जंगलांमध्ये पेट घेणारे वणवे, तसेच इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्यावेळी कार्बन हा खात्रीचा स्रोत आहे. पृथ्वीवरील जैवविविधतेत असे अनेक घटक आहेत, ज्यांचा अधिवास पूर्णपणे केवळ गवताळ प्रदेशांवरच अवलंबून असतो. यातील काही प्रजातींचा अधिवास नष्ट झाला आहे, तर काही प्रजाती दुर्मीळ झाल्या आहेत.
 
 
गवताळ प्रदेशावर प्राणी, पक्षी, कीटक तसेच काही सरपटणार्‍या प्राण्यांच्या विविध प्रजातींचा अधिवास अवलंबून असतो. चिंकारा आणि काळविटे या सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, माळढोक, ’हॅरियर्स’ यांसारखे पक्षी, तर ’फॅनथ्रोटेड लिझर्ड’ यांसारखे सरपटणारे आणि अन्य उभयचर प्राणी अशा काही प्रमुख प्रजातींचा अधिवास आढळतो. सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी इ. प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती लक्षात घेतल्यास, गवताळ प्रदेशांवर जवळजवळ 250हून अधिक प्रजातींचा अधिवास अवलंबून असतो.कार्बन, लोकसंख्या आणि जैवविविधता या तीन प्रमुख घटकांवर गवताळ प्रदेशांचे अस्तित्व अवलंबून आहे. सध्या हवामान बदलाचा मोठा प्रश्न जगाला भेडसावतो आहे. या हवामान आणि वातावरणीय बदलांचा मोठा परिणाम गवताळ प्रदेशांवरही दिसून येतो. पावसाचे प्रमाण आणि एकूणच पर्जन्यचक्रात झालेल्या बदलांमुळे गवताळ प्रदेशांवरील गवत, तृण यांची योग्य वाढ होत नाही. पाऊस उशिरा पडला, तर गवत वाढण्याचा योग्य काळ निघून जातो आणि नंतर जोरदार कोसळणार्‍या पावसामुळे या गवताची योग्य ती वाढ होत नाही. यामुळे गवताचे असलेले विशिष्ट चक्र पूर्ण होत नाही. भरपूर प्रमाणात पाऊस पडला, तर त्यामुळे जमिनीची धूप होते. याला आपण ’छोटे पूर येतात’ असेही म्हणू शकतो. कारण, त्या क्षेत्राची ’वॉटर कंटेनिंग कपॅसिटी’ म्हणजेच जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली असते. यावरुनच गवताळ प्रदेशाची एकू ण परिसंस्था हवामान बदलामुळे बिघडलेली आहे, असे एकंदर चित्र दिसून येते.

पूर्वी वनविभागाकडे केवळ महसुलासाठी म्हणून बघितले जायचे, त्यामुळे ज्या भागात मोठमोठी झाडे होती, त्या भागांवर/क्षेत्रांवर जास्त लक्ष केंद्रित केले गेले आणि परिणामी गवताळ प्रदेश दुर्लक्षितच राहिले. त्यामुळेच पुढे हे गवताळ प्रदेश मग शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी वापरात येऊ लागले.शेतीसाठी वापरात आणलेल्या या प्रदेशामध्ये पूर्वी पारंपरिक शेती केली जात होती. त्यामुळे फारसे नुकसान होत नव्हते. परंतु, जसजशी लोकसंख्या वाढत गेली, तसतसे गवताळ प्रदेशांचे शेतीत रुपांतरण होण्याच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली. तसेच ही शेती आधुनिक पद्धतीने केल्यामुळे त्याचेही गंभीर परिणाम या परिसंस्थेवर दिसू लागले. तेव्हा आज बदललेल्या शेतीपद्धतीमुळे सर्व संतुलन बिघडत आहे. त्यामुळे गवताळ प्रदेशांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. गवताळ प्रदेशांना धोरणात्मक पातळीवर प्राधान्याने संरक्षित करण्याचा भूप्रदेश म्हणून बघण्याची गरज आहे. संवर्धन राखीव क्षेत्राच्या नकाशावर गवताळ प्रदेश हे प्राधान्याने करायचे भूप्रदेश (लॅण्डस्केप) म्हणून केल्यामुळे हे संकट ओढवले आहे. ’ग्रेझिंग लॅण्ड’ म्हणजे गुरे चराईसाठी असलेले क्षेत्र. म्हणून त्याला स्थान न देता त्याला सरळ औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी दिली जाते ही शोकांतिका आहे.
 
 
’द ग्रासलॅण्ड्स’ ट्रस्टचे योगदान...
 
 
’द ग्रासलॅण्ड्स ट्रस्ट’ ही संस्था 2019 पासून गवताळ प्रदेशांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अधिकृतरित्या काम करणारी संस्था. या संस्थेचे अधिकृतपणे 2019 साली काम सुरू झाले असले, तरी संस्थेतील इतर सदस्य आपापल्या वैयक्तिक पातळीवर गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. ’द ग्रासलॅण्ड्स ट्रस्ट’चे प्रमुख ध्येय गवताळ प्रदेशांचे संवर्धन करणे हे असून त्यासाठी वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये जाऊन गवताळ प्रदेशांविषयी जनजागृती करणे, तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नांचे किंवा शंकांचे निरसन करणे हे काम प्रामुख्याने सुरू आहे. कारण, जनजागृती करण्याचा गवताळ प्रदेश वाचविण्यात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर ज्या गवतांच्या/ तृणांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत, त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रकल्प ’द ग्रासलॅण्ड्स ट्रस्ट’मार्फत राबविले जातात. गवताळ प्रदेशांमध्ये होणार्‍या बदलांचा अभ्यास करणे तसेच ’द ग्रासलॅण्ड्स’ डिस्ट्रीब्युशनचे काम केले जाते. वनविभागाबरोबर समन्वयाने या संस्थेचे राज्यस्तरीय प्रकल्पदेखील सुरू आहेत. पारंपरिक आणि आधुनिक संवर्धनाच्या पद्धती या दोन पद्धतींनी ’द ग्रासलॅण्ड्स ट्रस्ट’चे प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर ’द ग्रासलॅण्ड्स’वर जनजागृतीपर माहितीपट तयार करुन त्यांच्या प्रदर्शनाचे कामही चालू आहे. वनविभाग आणि इतर क्षेत्रातील लोकांसमवेत मकपॅसिटी बिल्डींग वर्कशॉप्सफ आणि प्रबोधनात्मक काम सुरू आहे.



-मिहिर गोडबोले
(शब्दांकन : समृद्धी ढमाले)


अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121