मुंबई : यंदाच्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्षांची निवड झाल्या नंतर आयोजन व इतर अनेक बाबींविषयी चर्चा झाली. त्यावेळी मंडळाच्या उषा तांबे यांनी संमेलनात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाविषयी भाष्य केले. "शासनाकडून अनुदान मिळते त्यामुळे राजकीय नेत्यांनाही संमेलन महत्वाचे वाटते. त्यांचा हस्तक्षेप होतोच मात्र त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. आजवर एकाच व्यक्ती तब्बल १७ संमेलनांना उदघाटनप्रसंगी उपस्थित राहिला आहे. परंतु इलाज नाही" असे वक्त्यव्य उषा यांनी केले.
यावेळी आयोजनासोबतच खर्च व इतर बाबींवरही चर्चा झाली. मराठीला अभिजात दर्जा मिळत नसल्याच्या मुद्द्यावरूनही चर्चा झाली. यावेळी, आपण सर्वंनी एकत्र येऊन अभिजात दर्जा मिळ्वण्याविषयी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन तांबे यांनी केले. इतर भाषेतील उद्घटकांना यावर्षी मंचावर आमंत्रण देण्यापेक्षा आपल्याच भाषेतील मान्यवरांशी बोलावण्यात येईल परंतु दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचं आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.
तसेच गतवर्षी गेले गोलाकार रचल्याने प्रकाशकांची गैरसोय झाली यावर्षी तसे होऊ नये याची खबरदारी घेण्यात येईल.