गणेशखिंड परिसरातील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या शेजारी ‘महाऊर्जा’ची नवीन इमारत आकारास येत आहे. ‘महाऊर्जा’ची नवीन इमारत GRIHA ग्रीन बिल्डिंग नामांकनानुसार पंचतारांकीत नामांकन घेण्याच्या दृष्टीने बनवण्यात येत आहे. सोबतच ही इमारत भारत सरकारच्या ‘सुपर ईसीबीसी’ नामांकनाच्या नियमावलीत बसणारी आहे. ही इमारत ऊर्जा संवर्धनाचे विशेष प्रयोजन करून बनवण्यात येत आहे.
‘महाऊर्जा’च्या बनविण्यात येत असलेल्या इमारतीमधील काही विशेष बाबी खालीलप्रमाणे आहेत:-
‘सुपर एउइउ २०१७’ आणि ‘नेट झिरो’ पूरक नियमावलीनुसार इमारतीची रचना करण्यात आली आहे.
इमारत सात मजल्यांची बनविण्यात येत असून एकूण बिल्ट-अप क्षेत्र अंदाजे ११,९०० स्क्वे. मी. आहे.
इमारतीमध्ये सोलर व इतर नवीन अपारंपरिक तंत्रज्ञानसाठी प्रयोगशाळेचे प्रयोजन करण्यात आले आहे.
२५० ज्ञथ पर्यंत सौर व पवनऊर्जा निर्मिती प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मिती करण्यात येईल.
रेडियंट कूलिंग, अर्थ ट्यूब कूलिंग, दोन टप्यातील इव्हेपोरेटिव्ह कूलिंग, फोटोग्राफिक कोटिंग यांसारख्या विविध प्रात्यक्षिक ऊर्जा संवर्धन उपायांचा परिचय सदर इमारतीमध्ये आहे.
महासंचालक बंगला आणि व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस इमारतीच्या आवारात बनविण्यात येत आहे.
‘महाऊर्जा’च्या प्रमुख उद्दिष्टांपैकी ऊर्जा संवर्धनाला चालना देणे हे एक उद्दिष्ट आहे, ‘महाऊर्जा’ची इमारत हेच उद्दिष्ट साध्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
इमारतीच्या सोलर पॅसिव्ह आर्किटेक्चरल डिझाईनमुळे ही इमारत ऊर्जा कार्यक्षमता प्रदर्शित करण्यास सक्षम आहे. सोलर पॅसिव्ह डिझाइन स्ट्रॅटेजीजचे एकत्रीकरण, रहिवाशांच्या आरामाची पूर्णपणे काळजी घेऊन उर्जेचा वापर नियंत्रित पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे.
हे आयकॉनिक कॅम्पस प्रभावी कृत्रिम प्रकाश, वातानुकूलन, वायुवीजन प्रणाली आणि इतर प्रात्यक्षिक पर्यायी कूलिंग तंत्रज्ञान जसे की रेडियंट कूलिंग, अर्थ ट्यूब कूलिंग, टू स्टेज एव्हपोरेटिव्ह कूलिंग इत्यादींचे एकत्रीकरण दर्शविन्यास सक्षम असेल.
ही इमारत वापर आणि देखरेखीसाठीचे सर्वोत्तम उदाहरण असेल. कारण, इमारतीमध्ये वापरली जाणारी ऊर्जा ‘हाईएंड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम’ कायमस्वरूपी उर्जा कार्यक्षमता राखण्यासाठी प्रयत्न करेल.
देशी वनस्पतींसह विविध झाडांद्वारे बाष्पोत्सर्जन करून इमारतीमध्ये येणारी हवा थंड करण्यास मदत होईल, तसेच इमारतीच्या बाजूचे ‘मायक्रो क्लायमेट’देखील सुधारेल.
अशा अनेक प्रकारे ही ‘महाऊर्जा’ची नवीन इमारत ऊर्जा संवर्धन विषयीचे विविध तंत्रज्ञान दर्शवणारी असेल. चला, ऊर्जा वाचवूया आणि येणारे भविष्य उज्ज्वल करूया!
पंकज तगलपल्लेवार
महाव्यवस्थापक (ऊर्जा संवर्धन)
महाऊर्जा, पुणे