ठाणे : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या पदवीधर प्रकोष्ठच्या कोकण प्रदेश सहसंयोजक पदी आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन बी. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन मोरे यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य व योगदान ध्यानात घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक धनराज विसपुते यांनी ही नियुक्ती केली आहे. दरम्यान, आ.संजय केळकर तसेच जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संघटन कौशल्याद्वारे पदवीधर प्रकोष्ठच्या माध्यमातून पदवीधरांच्या उन्नतीसाठी तसेच पदवीधरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यतप्तर राहणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.