आळंदी : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे संस्थेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान रविवारी दि. ११ जून रोजी पंढरपूर कडे प्रस्थान केले. सुमंत भांगे, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मुख्य संकल्पनेतून डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, सुनिल वारे, महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टी कडुन पालखी सोहळ्यात संविधान दिंडीच्या माध्यमातून वारकरी बांधवाना भारतीय राज्यघटनेची माहिती व्हावी, आपले अधिकार कर्तव्याची जाणीव व्हावी व संतांच्या समतावादी विचाराचा प्रसार व्हावा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व ईतर महापुरुषांच्या सामाजिक समतेचा विचार वारकरी बांधवांमध्ये होण्यासाठी या संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, दि. ११ जून रोजी चरोली फाटा, आळंदी पुणे येथे संविधान दिंडीचे प्रस्थान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कार्यालय अधिक्षक सुभेदार सचिन जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी नरेश गोटे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक बार्टी, यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकपणे वाचन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, डॉ प्रेम हनवते, यांनी पालखी सोहळ्यातील संविधान दिंडीचे महत्व विशद करून बार्टी संताचा व महापुरुषांचा विचार पुढे नेत असुन समाज कल्याण व बार्टी संस्थेच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वारकरी बांधवांनी घ्यावा तसेच संविधान दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच, बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारकरी बांधवांना संविधानाची माहिती देऊन त्यांना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका भेट देऊन सन्मानित केले.
यावेळी कार्यालय अधिक्षक सुभेदार सचिन जगदाळे, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, डॉ प्रेम हनवते, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नरेश गोटे, डॉ अंकुश गायकवाड, प्रकल्प अधिकारी श्रीमती सुनंदाताई गायकवाड, शितल बंडगर, प्रकाशन व प्रसिद्धी विभागाचे रामदास लोखंडे यांच्यासह प्रा.सीमा खामनकर प्रशांत खामकर आणि असंख्य वारकरी बांधव बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.