खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंह पंजावाड पाकिस्तानात ठार, जाणून घ्या कोणी मारले?

    06-May-2023
Total Views |
Paramjit Singh Panjwar killed-in-lahore

इस्लामाबाद : खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंह पंजावाड याची पाकिस्तानात लाहोरमध्ये गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. तो १९९० सालामध्ये पाकिस्तानात पळून गेला होता. जोहर शहरातील सनफ्लॅावर सोसायटीमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला. तसेच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. पंचावडने ३० जून १९९९ मध्ये चंदीगड पासपोर्ट कार्यालयाजवळ स्कूटरमध्ये बॅाम्ब ठेवून बॅाम्ब स्फोट घडवला होता.
 
पंजावाड हा खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख

परमजीत सिंह पंजावाड हा खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. पंजावाड यांनी ९० च्या दशकापासून पाकिस्तानात आश्रय घेतला होता. तो मलिक सरदार सिंग या नावाने पाकिस्तानात राहत होता. ९० च्या दशकापूर्वीही तो भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता. १९८६ मध्ये ते पाकिस्तानात गेल्याचे सांगितले जाते. जिथे त्याने लाहोरसह अनेक ठिकाणे बदलली.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने २०२० मध्ये ९ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये पंजावाडच्या नावाचा समावेश होता. त्या यादीत पंजावाड व्यतिरिक्त, बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) प्रमुख वाधवा सिंग बब्बर यांचे नाव देखील होते, जो तरनतारनमधील दासुवाल गावचा रहिवासी आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.