भाजपा प्रदेश कार्यालय सचिवपदी मुकुंद कुलकर्णी

    05-May-2023
Total Views | 264
Mukund Kulkarni

मुंबई
: भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या सचिवपदी मुकुंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रदेश मुख्यालय सहप्रभारीपदी ज्येष्ठ कार्यकर्ते सुमंत घैसास यांची तर प्रदेश कार्यालय सहसचिव म्हणून भरत राऊत, संजय फांजे आणि सदाशिव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते या सर्वांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. श्री.कुलकर्णी हे २०१५ पासून प्रदेश कार्यालय सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121