मजार जिहाद म्हणजे काय? का वापरला जातोय हा पॅटर्न?

    07-Apr-2023
Total Views |

मजार जिहाद म्हणजे काय?

Majar Jihad



देवभूमी
:  काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिमच्या मजारीबद्दल अशीच मोहिम उघडली होती. माहिमच्या दर्गानजीक उभी राहिलेली मजार हटविण्याची मागणी त्यांनी केली होती. मुंबई पोलीस, पालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मजार हटविण्याची मागणी केली होती. राज्य सरकारनेही तातडीने ही बेकायदा मजार जमिनदोस्त केली.
 
ज्या जागांचा भाव भविष्यात वाढणार आहे, तिथे अतिक्रमण करायचं. पण नुसतं अतिक्रमण जर केलं तर सरकार त्याच्यावर बुलडोझर फिरवणार, म्हणून काही कट्टरपंथी घुसखोरांनी यावर युक्ती लढवली. अशा जागांवर मजारी उभ्या केल्या. जेणेकरुन प्रशासन त्यांना हातही लावू शकणार नाही, श्रद्धेचा आणि आस्थेचा फायदा घेत एकाचा निधन झालेल्या व्यक्तीच्या नावे दोन ते तीन मजारी उभ्या करुन सरकारी जागा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
ज्या जागांवर बेकायदा मजारी उभ्या केल्या आहेत, त्यात जिम कार्बेट नॅशनल पार्कचाही सामावेश आहे. यानंतर पूर्वीप्रामणे उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी यांच्या सरकारने सर्वबाबींवर लक्ष केंद्रीत केले. उत्तराखंडच्या कालू सैय्यदच्या नावे एकूण १० बेकायदा मजारी उभारण्यात आला आहे. सैय्यद बाबा यांच्या नावे अर्धा डझनहून अधिक मजारी उभारण्यात आल्या आहेत.
धामी सरकारने राज्यात ज्या ज्या ठिकाणी सरकारी जमिनींवर कब्जा केला आहे, त्यांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू केले आहे.
 
सरकारी जमिनींवर कब्जा करून मजारी आणि अन्य बेकायदा बांधकामे बांधली जात आहेत. ही सर्व बांधकामे सरकारच्या रडारवर आहेत. ज्या ज्या लोकांनी यावर बेकायदा कब्जा केला आहे, त्यांनी स्वतःच सहा महिन्यांत परिसर रिकामी करावा.
अन्यथा कायदेशीर कारवाईसह जागेवर बुलडोझर फिरवला जाणार आहे.
 
मुख्यमंत्री धामी यांनी या प्रकाराला लॅण्ड जिहाद, असे नाव दिले आहे. त्याला मजार जिहाद, असेही बोलले जात आहे. "आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. तर आम्ही पूर्णपणे बेकायदा बांधकामे साफ करणार आहोत. तुष्टीकरणाला आमच्या राज्यात स्थान नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
 
काही दिवसांपूर्वी धामी सरकारने बेकायदा बांधकामे ध्वस्त केली. बेकायदा कथित मजारी म्हटल्या जाणाऱ्या भागात कारवाई केली. मात्र, तिथे एकही मानवी मृतदेहाचे कुठलेच अवशेष सापडले नाही. मजार जिहाद पॅटर्नमध्ये बेकायदा मजारी उभ्या करायच्या आणि तिथली सरकारी जमिन हडपायची आणि वक्फ बोर्डाची संपत्ती घोषित करायची, असा सरळ सरळ डाव होता.

 
अग्रलेख
जरुर वाचा
पत्रकारिता हे लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं माध्यम आहे!

पत्रकारिता हे लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं माध्यम आहे!

"पत्रकारिता हा व्यवसाय म्हणजे केवळ रोजी रोटीचे साधन नसून, ते लोकशिक्षणाचं आणि प्रबोधनाचं माध्यम आहे याचं भान पत्रकारांनी बाळगायला हवं" असे प्रतिपादन विवेक साप्ताहिकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी केले. गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था, मुंबई विद्यापीठ मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम वर्ग आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ पत्रकार सुरेशचंद्र वैद्य, कवि दुर्गेश सोनार, अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांतचे अध्यक्ष प्रविण देशमुख, मराठी पत्रका..