पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास त्वरित पाणी पुरवठा करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

    07-Apr-2023
Total Views | 52
शंभूराज देसाई, पाणी पुरवठा, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, बोरवेल, पाणी टंचाई, Shambhuraj Desai, Water Supply, Collector, Deputy Collector, Borewell, Water Scarcity पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास त्वरित पाणी पुरवठा करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : उन्हाळ्याचा हंगाम सुरु झालेला आहे. या हंगामात ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. ज्या गावाकडून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास त्या गावाला त्वरित पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव आदी उपस्थित होते.

टंचाईच्या काळात करावयाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींबरोबर लवकरात लवकर बैठक घेऊन टंचाईसंदर्भात लोकप्रतिनिधींनी सांगितलेल्या उपायोजनांबाबत कार्यवाही करावी.

ज्या ठिकाणी बोरवेलची दुरुस्ती करावयाची असल्यास ती त्वरीत करावी. तसेच विहिरी अधिग्रहण करण्याची वेळ आल्यास तेही करावे. टंचाई कालावधीत मागेल त्या गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले जातील, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले. २७.५ कोटी किंमतीचे शेअर्स आणि दालमिया सिमेंट्स लिमिटेड यांच्या मालकीची ३७७.२ किंमतीची जमीन तात्पुरीची जप्त केली आहे. यावर डीसीबीएलने म्हटले की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी किंमतीची आहे. हा जप्तीचा खटला दाखल झाल्यानंतर १४ वर्षानंतर हा खटला सुरू करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने जप्तीचा निर्णय केंद्रीय अन्वेशन ब्युरोने २०११ मध्ये भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यात ..

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी गुरुवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. त्यात व्यापारी नेते, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि दाऊदी बोहरा समाजातील अनेक प्रमुख प्रतिनिधींचा समावेश होता. उपस्थितांनी वक्फ बोर्डासोबत असलेल्या आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. शिष्टमंडळाने त्यांच्या समाजातील सदस्यांच्या मालमत्तेवर वक्फने चुकीचा दावा कसा केला हे देखील स्पष्ट केले. वक्फ दुरुस्ती कायदा आणल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानल्याचे दिसून आले. PM talk ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121