नंदुरबारमध्ये दगडफेक आणि जाळपोळ ; २५ हून अधिक जणांना अटक!

    05-Apr-2023
Total Views | 149
nandurbar-after-riot-in-two-group-more-than-25-people-arrested

नंदुरबार
: नंदुरबार येथील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दि. ४ एप्रिल रोजी रात्री दोन गटामध्ये झालेल्या वादात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केले. मात्र या समाजकंटकांनी दगडांसह काचेच्या बाटल्या फेकल्या त्यात तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अश्रुधुराच्या कांड्या फोडत पोलिसांनी अर्ध्यातासात परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या दंगलीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्रलेख
जरुर वाचा
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर, तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी!

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर, तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी!

(CM Fellowship Programme 2025-26) राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121