मुघलांचा इतिहास बदलणार योगी सरकार ! शिक्षण क्षेत्रातील पुढचे महत्वपूर्ण पाऊल
03-Apr-2023
Total Views | 63
25
मुंबई : गुलामगिरीची मानसिकता दर्शवणारी संस्कृती नको अशा विचारांबाबत नेहमीच आग्रही असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आता बारावी बोर्डातील मुघल इतिहासाकडे आपला मोहरा वळवला आहे. बारावी बोर्डाच्या अभ्यासक्रमात मुघल कालीन इतिहासावर आधारित पाठ आता काढून टाकण्यात आलेले आहेत असे स्पष्ट केले. उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSE बोर्ड यांचा अभ्यासक्रम या धोरणानुसार बदलण्यातयेत आहे. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय काढून टाकण्यात आला आहे. तसंच, ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात आले आहेत. २०२३-२४ या वर्षापासून हा बदल करण्यात येत आहे.
इतिहासाच्या पुस्तकातही काही पाठ हटवण्यात आले आहेत. नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचं वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे हटवण्यात आले आहेत. हा निर्णयझाल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सांगितले, “आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकवलं पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते हा विषय शिकवलाच गेला नाही. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत.”
यापूर्वी आग्रा मुघल म्युझियमचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असे नामकरण योगी सरकारने केले होते. मुघल राज्यकर्त्यांबाबतचा योगी सरकारचा द्वेष याच वेळी दिसून आला होता. त्यानंतर गुलामगिरी दाखवणारी संस्कृती नको म्हणणाऱ्या योगी सरकारच्या निर्णयाचे राज्यातून स्वागतच होत आहे.