बीड येथील तरुणाचा विश्वविक्रम, तब्बल २६ तास सादर केली लावणी
03-Apr-2023
Total Views |
मुंबई : बीडच्या गेवराईत नॉनस्टॉप 26 तास लावणी नृत्याचा विश्वविक्रम करण्यात आला आहे. या विश्वविक्रमामुळे युवा लावणीसम्राट शिवम इंगळेच्या नृत्याची ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. गेवराई येथील बालग्राममध्ये 30 मार्च रोजी सकाळी 11.40 वाजता सुरू झाला होता. तो 31 मार्च रोजी 1.40 वाजता थांबला. यापूर्वी तामिळनाडू ट्रेडिशनल करकम फोक डान्स येथे सलग 5 तास लावणी सादर करण्याचा विक्रम ए. शहाजान यांच्या नावे होता.