राज्यात आता महिलांसाठी मोबाईल व्हॅन सुविधा

फडणवीस शिंदेंच्या हस्ते व्हॅनचे उदघाटन

    21-Apr-2023
Total Views | 51
mobile van

मुंबई
: मुंबईतील महिलांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक नवा पर्याय आणण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर अर्थात सरकार आपल्या दारी या उपक्रमाला सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून मोबाईल व्हॅन सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोबाईल व्हॅनचा उदघाटन सोहळा सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला.

शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह इतर काही मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या (सरकार आपल्या दारी) मोबाईल व्हॅन ही १९ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या सरकार आपल्या दारी हा उपक्रम सुरू असलेल्या वॉर्डमध्ये फिरणार असून,या फिरत्या व्हॅन मध्ये एल ई डी स्क्रीन असून या मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121