कोल्हापुर : कालीचरण महाराजांनी आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता कालीचरण महाराज कोल्हापुरात म्हणाले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते बिल्कूल योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे. जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधींचे विरोधक व्हाल , असा दावा ही कालीचरण महाराजांनी केला आहे.
तसेच राहुल गांधीच्या खासदारकी बद्दल ही बोलताना राहुल गांधी वरील कारवाई योग्यच आहे, असे ही कालीचरण महाराज म्हणाले. त्याचबरोबर जे हिंदू हिताची गोष्ट करतात ते यांच्यासाठी शत्रू आहेत, असा टोला ही कालीचरण महारांजानी लगावला.