लव्ह जिहाद नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी भयावह घटना

    29-Mar-2023
Total Views | 238

Love Jihad (1)

( Love Jihad - Image Source Maha MTB ) 

वय वर्षे २५... शिक्षण बी.ए. नुकतेच यौवनात पदार्पण... या वयात प्रेम होणे ही सामान्य आणि तशी सुखद अनुभव देणारी गोष्ट. पण तक्रारदार पीडितेवर या प्रेमामुळे दुःखाचा डोंगर कोसळणारा ठरला. पीडिता लव्ह जिहादची ( Love Jihad ) बळी ठरली. मसूद रज्जाक शाह या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळून आले. त्याने तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. दोघांनी तशा आणाभाकाही घेतल्या. पण तुला निकाह करण्यासाठी धर्म बदलावा लागेल, अशी अट अहमदने घातली. याने भेदरलेल्या पीडितेने या गोष्टीला नकार दिला... आणि इथूनच सुरू झाली तिच्यावरील अत्याचारांची मालिका. 

 लव्ह जिहादच्या  मोडस ऑपरेंडी ( Love Jihad Modus Operandi) प्रमाणे आश्वासनाचे पहिले जाळे पीडितेवर फेकण्यात आले की... लग्नानंतर मुस्लिम रीतीरिवाज पाळण्यासाठी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही... मसूदच्या या आश्वासनाला बळी पडून पीडिता लग्नाला तयार झाली. मात्र तिचा मुस्लीम रितीरिवाजानुसार, निकाह करण्यता आला. वधू आणि वर दोघेही मुस्लीम असतील तरच निकाह होऊ शकतो... कळत नकळत ३१ डिसेंबर २०१८ रोजी पीडितेला मसूद शाहने मुस्लीम नाव ठेवले. या निकाहने व्यथीत झालेल्या पीडितेच्या माहेरच्यांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले मात्र पीडिता "मेरा अब्दुल ऐसा नही है" या फसव्या सिद्धांतावर अपरंपार विश्वास होता आणि तिथेच घात झाला... सावज लव्ह जिहादच्या ( Love Jihad ) सापळ्यात पुरते अडकले होते.

मसुदने निकाह नंतर सगळ्यात आधी काय केले असेल तर ते म्हणजे. पुढील शिक्षण बंद करून टाकले. पुढे पीडिता गर्भवती राहिली. तिच्या आईने काळजीपोटी तिच्याशी बोलणे सुरू केले. लव्ह जिहादच्या मोडस ऑपरेंडी प्रमाणे पीडिता ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली होती. माहेरशी संबंध सुधारल्याने माहेरहून पैसे आणण्यासाठी पीडितेवर बळजबरी केली जाऊ लागली. तगादा आणि मानसिक छळ सुरू झाला. तिला तिच्या माहेरच्या हिंदू धर्मातील जातीवरून अत्यंत अश्लील भाषेतील अपमानास्पद बोलणी खावी लागत होती.
 
आरोपीची आई आणि वहिणी तिचे जगणे असहाय्य करत होत्या. कदाचित पैसे दिल्यास आपल्या मुलीचा छळ थांबेल या भाबड्या आशेपोटी पीडितेला आईने कर्ज काढून पीडितेच्या सासरच्यांच्या १४ लाख दिले. मात्र, लव्ह जिहादच्या षडयंत्राची सुतराम कल्पना नसलेल्या पीडितेच्या माहेरच्यांची आशा अपेक्षेप्रमाणे फोल ठरली. बदल्यात मसूद पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यावरून तिला बेदम मारहाण होऊ लागली.
 
आता पीडितेच्या सासरच्यांनी पुढील पैशासाठी मोर्चा पीडितेच्या आजीकडे वळवला. तुला तुझ्या धर्मातील अनुसूचित जातीतून मुस्लीम धर्मात घेतल्याची ही किंमत तुला चुकवावीच लागेल, असे सांगत पुढील पैशांची मागणी केली जात होती. त्यासाठी वारंवार पीडितेच्या हिंदू धर्मातील अनुसूचित जातीचा अर्वाच्च भाषेत शिव्या घातल्या जात होत्या. 
 
लव्ह जिहादच्या  ( Love Jihad ) सुनियोजित कार्यपद्धतीप्रमाणे आता पीडितेच्या सासरच्या नराधमांसाठी ATM ठरली होती. पीडितेच्या आजीकडून या वीरप्पन गॅंगने १ लाख रुपये उकळले. पण त्यांचे समाधान झाले नाही. पीडितेच्या आजोबांकडून त्यांनी १ लाख रुपये कर्जाऊ म्हणून घेतले. ते परत केलेच नाही. पैसे संपले की पीडितेविरोधात जातीवाचक शिवीगाळ सुरू होई. पीडितेचा पतीसह तिच्या सासरच्यांनी मानसिक छळ करायला सुरुवात केली. पीडितेची आई आजारी असताना तिला भेटण्यासाठीही जाऊ दिले नाही.
 
अखेर मसुदने पीडितेला पोटच्या दोन मुलींसह बेदम मारहाण केली. २३ डिसेंबर २०२२ रोजी तिला घरातून एकटीला हाकलून दिले. जीव बचावत पीडितेने पळ काढला. तिने सासरच्या मंडळी विरुद्ध चिपळूण पोलीस स्थानकात लिखित फिर्याद नोंदविली. लव्ह जिहादने  ( Love Jihad ) एका सुशिक्षित तरुणीच्या स्वप्नांवर नांगर फिरववला. तिचा टाहो "लव्ह जिहाद" अस्तित्वातच नाही म्हणून बेशरम तर्कट मांडणाऱ्या अवसान घातक्यांच्या आणि "मेरा अब्दुल ऐसा नहीं है" म्हणणाऱ्या हिंदू भगिनींच्या काळजाला जाऊन भिडावा हीच अपेक्षा.
 
महाराष्ट्र विधानसभेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदनामध्ये "लव्ह जिहाद" या विषयावर साधकबाधक चर्चा झाली. मात्र काही सन्माननीय सदस्यांनी "लव्ह जिहाद"  ( Love Jihad ) ही काल्पनिक संकल्पना असून असा कोणताही जिहाद अस्तित्वात नसल्याचे आश्चर्यकारक तर्कट मांडले... सोशल मीडियावर तशा आशयाच्या पोस्ट देखील टाकल्या. स्वतःला तथाकथित पुरोगामी, लिबरल्स, डावे म्हणवून घेणाऱ्या आणि लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही म्हणणाऱ्यांना अशा लाखो श्रद्धा वालकर भगिनींचा टाहो कधीच ऐकू येणार नाही का?



अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121