रत्नागिरीतील पाणीटंचाई, सरकार घेणार नियोजन बैठक

    17-Mar-2023
Total Views | 91
Water shortage in Ratnagiri, government to hold meeting

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईबाबत करावयाच्या उपाययोजना आणि पाणीपुरवण्यासंदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
 
विधानसभा सदस्य भास्कर जाधव, आदिती तटकरे यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.मंत्री पाटील म्हणाले की, रत्नागिरी येथील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आतापर्यंत करण्यात आलेली कार्यवाहीची माहिती पटलावर ठेवण्यात येईल. अधिवेशनादरम्यान घेण्यात येणाऱ्या बैठकीत विस्तृतपणे मे महिन्यापर्यंत पूर्ण करावयाची कार्यवाही याबाबतच्या सूचना विभागाला देण्यात येतील.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121