आजी-माजींच्या पंतप्रधानांच्या लढाईत पाकिस्तान कंगाल
आयएमएफचा कर्जाला नकार
15-Mar-2023
Total Views | 100
9
इस्लामाबाद : पाकिस्तानला आणखी कर्ज देण्यास आयएमएफतर्फे नकार देण्यात आला आहे. आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानचे भवितव्य धोक्यात आले आहे. इम्रान खान आणि शेहबाज शरीफ यांच्यातील देशवासीय नरकयातना भोगत आहेत. पाकिस्तानचे खायचे वांदे आहेत. मात्र, नेते आपसात भांडत आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला दिलेला कर्जाचा हप्ता पुन्हा स्थगित केला. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) पाकिस्तानच्या राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार देत आहे. देशातील राजकीय लढाईमुळे अस्थिरता निर्माण होत आहे.
आयएमएफ कराराचे पालन व्हावे यासाठी नाणेनिधी आक्रमक आहे. अंमलबजावणीसाठी पाकिस्तानकडून आश्वासन घेतले जाणार आहे. देशातील राजकीय पक्षांनी अशी हमी द्यावी, असे नाणेनिधीचे म्हणणे आहे. पाकिस्तान आणि IMF यांच्यात तब्बल सात अब्ज डॉलरचा करार होणार आहे. मात्र, चर्चा अंतिम टप्प्यावर आली तरीही पाकिस्तानला अद्याप पहिला हप्ता जाहीर झालेला नाही.
आयएमएफ अटींचे पालन होईल अशी हमी सरकारला इमरान खान आणि इतर विरोधी पक्षांकडून हवी आहे. यासाठी आयएमएफ विरोधी पक्षांच्या संपर्कातही राहणरा आहे. त्यावेळी इमरान यांचे सहकार्य लागणार आहे. शेहबाज शरीफ इम्रान खान यांना पटवून देऊ शकतील, अशी शक्यता कमीच आहे. इम्रान खान यांना निवडणूका घ्यायच्या आहेत. देशाशी कोणताही व्यवहार आयएमएफने करू नये, सर्वकाही निवडणूकांनंतरच करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.