BMC Budget 2023 Updates: मुंबई पालिकेचा ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर
04-Feb-2023
Total Views | 103
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना आज शनिवार दि. ४फेब्रुवारी सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपये इतके होते. २०२३-२४ आकारमान ५२ हजार ६१९ कोटी ७ लाख रुपयांवर पोहोचले आहे.
मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
04 February, 2023 | 12:21
04 February, 2023 | 12:21
बेस्टला 800 कोटी तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी
मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात बेस्टला 800 कोटी रुपयांची मदत दिली जाणार तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते आणि पुलांसाठी तरतूद
मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पुलांसाठी 4925 कोटी रुपयांची तरतूद
महत्त्वाचे मुद्दे :
मुंबईकरांना मिळणार पार्किंग लॅाट
मुंबईकरांना पार्किंग अॅपच्या मदतीने 32 सार्वजनिक पार्किंग लॅाट आणि 91 ॲानस्ट्रीट वाहनतळ सेवा मिळणार आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1060 कोटी रूपयांची तरतूद
भायकळा येथील राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद
आरोग्य विभागासाठी 1680 कोटी रूपयांची तरतूद
मुंबई मलनिसारण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 2792 कोटी रुपये तरतूद
गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार.
मुंबई अग्निशमन दनगरलासाठी 227 कोटींची तरतूद.
पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 2570 कोटी रुपयांची तरतूद.
सात एसटीपी प्रकल्पांसाठी 2792 कोटी रूपयांची तरतूद.
मुंबईचा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणली आहे.
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न.
राज्य सरकारकडून मालमत्ता करासह विविध येणे थकबाकी 7223 कोटी इतकी आहे. थकबाकी देण्याची पालिकेची राज्य सरकारला विनंती.
नवीन करवाढीची कोणतीही घोषणा नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.