कारवाईचा पाठपुरावा घेण्यासाठी किरिट सोमय्या कोल्हापुरात!
23-Feb-2023
Total Views | 101
7
कोल्हापुर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप मुश्रीफांवर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. अश्यातच, आज किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर निशाणा साधताना एक मोठा दावा देखील केला.
सोमय्या म्हणाले, "कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेत भेट घेणार आहे. अनेक शेतकरी मुंबईला भेटण्यासाठी येतात, पण मी सांगितलं मीच भेटायला कोल्हापूरला येतो. गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या आपल्या जीवाची पर्वा करणार नाही. न्यायालयात काय होतंय पाहुया.' असं सोमय्या यावेळी म्हणाले.
पुढे म्हणाले, "हसन मुश्रीफ कुटुबीयांचा १५८ कोटींचा घोटाळा दिसत होता, पण तो ५०० कोटीहून अधिक होता. मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेलाही सोडलं नाही." असं सोमय्या म्हणाले. दरम्यान, ११ जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल १२ तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती.