महेश आहेर मारहाण प्रकरण : 'त्या' चौघा हल्लेखोरांना न्यायालयीन कोठडी

    20-Feb-2023
Total Views | 144
Mahesh Aher assault case

ठाणे
: ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही हल्लेखोरांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती. या मारहाणी प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकाला मारहाण, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी आ. जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी आणि विशांत गायकवाड या चौघांना अटक केली होती. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आव्हाड यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अटकपुर्व अंतरिम जामीन दिला होता.तर सोमवारी अभिजीत, विक्रम, हेमंत आणि विशांत या चौघा हल्लेखोरांना ठाणे सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 
आहेर यांच्या निलंबनासाठी आव्हाडांची पत्नी रस्त्यावर

ठाणे महापालिका सहायक आयुक्त महेश आहेरच्या निलंबनासाठी सोमवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलासोबत आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड रस्त्यावर उतरल्या. राष्ट्रवादीच्या महिलांनी काळे कपडे परिधान करत पक्ष कार्यलय ते ठाणे महापालिकेपर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेसमोर ठिय्या देत संयुक्तपणे आंदोलन केले. आहेर याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.अनधिकृत बांधकामा विरोधात आ.आव्हाड व आ. संजय केळकर लढा देत असल्याचे भाष्यही आंदोलकांनी केले.


अग्रलेख
जरुर वाचा
माझे कपडे काढून रात्रभर मला मारहाण केली; माझा मानसिक छळही..., बॉक्सर स्वीटी बोराचे पती दीपक हुड्डावर गंभीर आरोप

माझे कपडे काढून रात्रभर मला मारहाण केली; माझा मानसिक छळही..., बॉक्सर स्वीटी बोराचे पती दीपक हुड्डावर गंभीर आरोप

Sweety Bora हरियाणाची सुप्रसिद्ध असलेली बॉक्सर स्वीटी बोरा आणि कबड्डीपटू दीपक हुड्डा या पती-पत्नीतील वाद आता आणखी वाढला आहे. स्वीटीने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यात तिला गंभीर दुखापत झाली आहे. स्वीटीने आरोप केला की, तिचा पती दीपक हुड्डा तिला अनेकदा मारहाण करत असायचा. तसेच अनेकदा तिचा शारीरिक आणि मानसिक छळही करण्यात आला होता, असा आरोप पत्नी स्वीटीने केला आहे. त्यानंतर तिने असाही आरोप केला की, दीपक तिला घराबाहेर जाण्यास कोणतीही परवानगी देत नव्हता आणि त्याने आपली गाडीही काढून घेतली होती. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121