मुंबई : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथील विविध रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार विविध पदांच्या एकूण ६८ जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, या भरतीच्या माध्यमातून विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
जरुर वाचा >> 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मध्ये विविध पदांकरिता मेगाभरती; 'या' उमेदवारांना नोकरीची संधी!
एम्स, नागपूर अंतर्गत ‘वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी सहाय्यक, स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, तंत्रज्ञ (प्रयोगशाळा), तंत्रज्ञ (आराडी) ), फार्मासिस्ट, फायर टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, स्टेनोग्राफर, लॉन्ड्री पर्यवेक्षक, कनिष्ठ वॉर्डन, ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक’ पदांच्या एकूण ६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
वरील सर्व पदभरतीकरिता अर्जदारास दि. १२ डिसेंबर २०२३ पूर्वी अर्ज भरणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर, अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने स्वीकारला जाणार असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जशुल्क यासंदर्भात सविस्तर माहिती एम्स, नागपूरच्या
अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.