खानिवडे : पालघर-मनोर-विक्रमगड महामार्गावरील बोरांडा फाट्यावरील तलाठी कार्यालया समोर भरधाव वेगातील डंपरने एसटी बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विक्रमगड वरून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला ट्रकने धडक अपघात झाला असून अपघात ग्रस्त एसटी मधील जखमी झाले आहेत.स्थनिकांनी धाव घेत एसटी मधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान अपघातात जखमी प्रवाश्यांचा आकडा समोर आलेला नाही.
अपघात स्थळी मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू आहे. विक्रमगड रस्त्यावर बोरांडा,चाबके तलावली भागात दगड खाणी आणि क्रशर उद्योग फोफावला आहे. क्रशर मधून खडी वाहतूक करणारे डंपर भरधाव वेगाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे चालवल्या जात आहेत.बेदरकारपणे खडी वाहतूक करून अपघातांसाठी जबाबदार ठरणाऱ्या डंपरवर कारवाईची मागणी केली जात आहे.