मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्यांसाठी पुण्यात नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीकरिता पुणे शहरातील उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. या भरतीच्या माध्यमातून एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव -
वैद्यकीय अधिकारी (१५)
शैक्षणिक पात्रता -
एमबीबीएस असणे आवश्यक
वयोमर्यादा -
उमेदवाराचे वय ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ०५ वाजेपर्यंत