खानिवडे : वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी व एका ग्रामपंचायटीमधील एक जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत झालेल्या मतदानात मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. यातील पूर्वेच्या सायवन येथे मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
मात्र याच बरोबर अर्नाळा येथे इ व्ही एम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते .मिळालेल्या माहितीनुसार सकाळी जे मशीन बंद झाले त्याजागी दुसरी मशीन लावली मात्र तीही बंद पडली .त्यानंतर तिसरी मशीन लावून सकाळी दहा नंतर मतदानाला सुरवात झाली. यामुळे मतदारांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता.
वसई पूर्वेकडील एकमेव सायवन ग्रामपंचायतिची निवडणूक होत असून ९ सदस्य व एक सरपंच अशा १० जागांसाठी निवडणूक होत आहे .येथे सत्ताधारी बहूजन विकास आघाडी, शिवसेना व मनसे अशी तिरंगी लढत होत आहे.
सायवन ग्रामपंचायत हद्दीमध्ये घाटेघर, पळीपाडा, चाळीसगाव, सायवन व इतर गावपड्यांचा समावेश असून सुमारे १३०० मतदार आहेत . सध्या भात शेती कापणीची कामे असल्याने सकाळीच ग्रामस्थ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला .त्यामुळे येथे भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या . दुपारनंतर येथे ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तर दीड वाजेपर्यंत तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये ४३ .७५ इतके मतदान खाल्ले होते.
सायावन येथे या गावचे मतदार असलेले माजी खासदार बळीराम जाधव, व ठाणे जिल्ह्य मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मतदानाचा हक्क बाजवला व थेट सरपंचांसह सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला .पोट निवडणुकीत दुपारी दीड वाजेपर्यंत ७०टक्के मतदान झाले होते.