प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रावेर लोकसभा प्रवासावर

    29-Nov-2023
Total Views | 34
 ckb
जळगाव: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवार दि. 30 नोव्हेबर रोजी रावेर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील.
 
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.सकाळी 10.00 वा. मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात जामनेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी 11.45 वा. मलकापूर तहसील चौक ते निमवाडी चौकपर्यंत ‘संपर्क से समर्थन अभियाना’त सहभागी होत जनतेशी संवाद साधतील.
  
दुपारी 02.30 वा. भुसावळ येथील सिंधी समाज मंगल कार्यालयात रावेर, चोपडा व भुसावळ विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स तथा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी 04.00 वा. सिंधी कॉलनी परिसरात संपर्क से समर्थन अभियानातर्गत घर चलो अभियानात सहभागी होतील. यासोबतच ते काही संघटनात्मक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
 
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय भेगडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, रावेर लोकसभा समन्वयक शालिनी बुंधे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जळगाव पूर्व (रावेर) जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, मोहन शर्मा, मिलिंद धवले, अजय नागराणी, संदीप सुरवाडे यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..