मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर बीएमसीची धडक कारवाई!
28-Nov-2023
Total Views | 68
मुंबई : मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर बीएमसीने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली आहे. महापालिका आजपासून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाई सुरू करणार आहे. यासाठी पालिका सज्ज झाली असून प्रत्येक वॉर्डात दोन यांप्रमाणे २४ वॉर्डांत ४८ अधिकारी दुकानांची पाहणी करत आहेत.
यावेळी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना पालिका अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. मुंबईत पाच ते सात लाखांहून अधिक दुकाने आहेत. यापैकी अंदाजे दोन लाखांहून अधिक दुकाने व आस्थापनांनी दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे. दुकानांवर मराठीत पाटी नसल्यास प्रति कामगार दोन हजार रुपये दंड किंवा न्यायालयीन कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.