गांधीनगर : भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४० धावा फलकावर लावू शकला. दरम्यान, भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी अनुक्रमे ४७ आणि ५४ धावांची खेळी केली. उर्वरित अन्य खेळाडूंनी के एल राहूलचा ( १०७ चेंडूत ६६ धावा) अपवाद सोडला तर एकाही खेळाडू फारसा चांगला खेळ करता आलेला नाही.
ऑस्ट्रेलियन बॉलिंग लाईनअप यावेळेस उत्तम पहायला मिळाली. कर्णधार पॅट कमिंसने भारतीय संघाला २५० धावांत रोखण्याकरिता योग्य रणनीतीचा वापर करत स्वतः स्टार फलंदाज विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेण्यात यशस्वी ठरला. त्याने ३४ धावा देत २ बळी घेतले. तर मिचेल स्टार्कने ५५ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळविण्याकरिता कांगारूंपुढे २४१ धावांचे लक्ष्य असणार आहे. यंदाचा विश्वचषक जिंकण्याची संधी भारताला गोलंदाजीच मिळवून देईल. त्यामुळे टीम इंडियाच्या बॉलिंग लाईन अपला चमकदार कामगिरी करावी लागेल.