मुंबई : 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड' अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'मधील रिक्त जागांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
दरम्यान, या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. या भरतीकरिता अर्जदारास दि. ३१ ऑक्टोबर २०२३च्या आधी अर्ज करावयाचा आहे. तसेच, या भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.