वाडा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाडा शाखेच्यावतीने मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी विजयादशमी (दसरा) उत्सवानिमित्ताने वाडा शहरात पथसंचलन करून उत्सव साजरा करण्यात आला. या संचलनात गणवेश परिधान करून मोठ्या संख्येने संघाचे सदस्य सहभागी झाले होते. प्राचीन गौरवशाली काळापासून अधर्मावर धर्माची मात, विजयाची परंपरा आणि शक्तीची उपासना, याचे एकत्रीतपणे स्मरण करून देणारा आपल्या हिंदू समाजाचा एक प्रमुख उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रकट स्वरुपात दरवर्षी साजरा करीत असतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पी. जे. हायस्कूलच्या प्रांगणात शस्त्रपूजन करून स्वयंसेवकांना जिल्हा सहकार्यवाहकांनी मार्गदशन केले. संघाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यासंदर्भात माहिती दिली. हिंदू संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम आपले आहे आणि ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने वाडा शहरात विजयादशमी (दसरा) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.