मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून कुलसचिव, संचालक पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
मराठवाडा विद्यापीठातील रिक्त पदांच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १३ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.