पालघर : नाशिक, सोलापूर, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. राज्यात होणाऱ्या सलग कारवाईंमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यात अंमली पदार्थ विकणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिरा-भाईंदर पोलिसांना मिळाली. त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेने ही गुप्त कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. एका फार्म हाऊसवर हा कारखाना चालू होता. या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आले आहे.