इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा मानवतेच्या दृष्टिकोनातून निषेध केला पाहिजे : मोहन सालेकर

    21-Oct-2023
Total Views | 58
VHP Mohan Salekar On Hamas Conflict
 
मुंबई : "हजारो वर्षांपासून भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहे. त्यामुळे इस्रायली नागरिकांची वेदना आपण एक देश म्हणून समजू शकतो. म्हणून केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला पाहिजे"; असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी केले. इस्रायलच्या समर्थनात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून शनिवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ते बोलत होते.

दहशतवादी संघटना हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. या संकटप्रसंगी इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी आणि हमास समर्थकांचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंद दलाने मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. दोन्ही संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला.

मुंबईच्या मुस्लीम जिमखाना येथे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ शुक्रवारी एक सभा घेतली. या सभेत इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. अबू आझमीच्या या कृत्याचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच पॅलेस्टाईनच्या नावाखाली हमासचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसचाही विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री श्रीराज नायर यांनी नाव न घेता निषेध केला.

युद्ध हमासने सुरू केले आहे. याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. भारत सरकारने इस्रायलला पाठिंबा दिला असताना देखील त्याला विरोध करणाऱ्या देशातील दहशतवादी हमासच्या समर्थकांना शोधून काढून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल भारत सरकारकडे करत आहे.
श्रीराज नायर, प्रांत सहमंत्री, विश्व हिंदू परिषद

"काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविषयी अबू आझमी यांच्यासारखी लोक काहीच बोलत नाहीत. पण जेव्हा-जेव्हा हमाससारख्या दहशतवादी संघटना पुढे येतात. तेव्हा लगेच ही लोक त्यांचे समर्थन करण्यासाठी पुढे येतात. अशी दहशतवादाची समर्थन करणारी लोकं पुढे येतील तेव्हा-तेव्हा बजरंग दल यांना ठेचण्यासाठी पुढे येईल" असे प्रतिपादन प्रांत संयोजक संदीप भगत यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना केले.

अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121