“पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…”, झिम्मा २ होणार या दिवशी प्रदर्शित

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग #तुमचेआमचेReunion करण्यास सज्ज

    19-Oct-2023
Total Views | 46
 
zimma
 
 
मुंबई : चार ते पाच महिला एकत्र आल्या की भांडणंच होतात हा संभ्रम दुर करणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' हा चित्रपट. कोरोना काळानंतर प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे 'झिम्मा'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई तर केलीच पण प्रेक्षकांच्या मनावरही जादू केली होती. आता लवकरच ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
 
zimma 2 
 
‘झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…”, अशी पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. जिओ स्टिडिओज, कलर यल्लो आणि चलचित्र मंडळी यांची निर्मीती असलेला 'झिम्मा २' येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121