इगतपुरी-कसारा घाट आता अवघ्या १० मिनिटांत पार होणार!

    19-Oct-2023
Total Views | 41
 
Igatpuri-Kasara Ghat
 
 
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला राज्याच्या उपराजधानीशी जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावरील देशातील सर्वात रुंद आणि राज्यातील सर्वात लांब द्वीन ट्यूब रोड बोगदा पूर्णतः तयार झाला आहे. विक्रमी वेळेत बांधण्यात आलेला दुहेरी बोगदा, मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी-कसारा घाट ओलांडण्यासाठी वाहनांना 20 ते 25 मिनिटे लागतात, तर समृद्धी येथे बांधण्यात आलेल्या या बोगद्यामुळे वाहने केवळ 10 ते 12 मिनिटांत घाट पार करु शकतात.
 
हे बोगदे विक्रमी वेळेत बांधण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळातही २ हजार कामगार आणि अभियंत्यांसह बोगद्याचे काम सुरूच होते. 'न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग' मेथड वापरून तयार केलेले जुळे बोगदे आधुनिक वायु, वीज, अग्निशमन आणि सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत. अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच उच्च दाबाची पाणी धुके प्रणाली बसवण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण समृद्धी एक्स्प्रेस वेवर बांधण्यात येणाऱ्या 6 बोगद्यांपैकी हा बोगदा सर्वात लांब आणि रुंद आहे.
 
हा दुहेरी बोगदा डाव्या बाजूला 7.78 किमी लांब आणि उजव्या बाजूला 7.74 किमी लांब आणि 35 मीटर रुंद आहे. हा पहिला बोगदा आहे, ज्याच्या आत 26 क्रॉस पॅसेज करण्यात आले आहेत, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वाहने एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात सहज जाऊ शकतात. AFCON चे प्रोजेक्ट मॅनेजर शेखर दास यांच्या म्हणण्यानुसार, या अनोख्या बोगद्यात प्रथमच SCADA कंट्रोल सिस्टीम आहे, या अंतर्गत बोगद्यातील लाईट कधीही जाणार नाही. उच्च दाबाच्या धुके प्रणालीमध्ये, 60 अंशांवर आपोआप पाणी शिंपडणे सुरू होईल. लिक्वी केबल तंत्रज्ञानाचा वापर रेडिओ कम्युनिकेशन, मोबाईल आणि इतर दळणवळणाच्या माध्यमांसाठी केला जाईल, वाहतूक नियंत्रण यंत्रणा, स्वयंचलित यंत्रणा, सीसी टीव्ही, फायर अलार्म सिस्टमने सुसज्ज आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121