प्लास्टिकच्या पाऊलखुणा

(भाग १)

    15-Oct-2023
Total Views | 54


plastic footprint

कार्बन उत्सर्जन करणार्‍या प्रतिव्यक्तीमागे येणार्‍या सरासरीला जसे कार्बन फूटप्रिंट म्हटले जाते. तसेच, प्लास्टिकच्या पाऊलखुणा म्हणजे काय यावर प्रकाश टाकणारा हा लेख...



प्लास्टिक किती आणि का घातक ठरते, हे आता सर्वांच्याच चांगले लक्षात आले आहे. 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिकच जास्त आढळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच आपल्या अन्न, पाणी, हवा सगळीकडे प्लास्टिक प्रदूषके अधिराज्य गाजवू लागली आहेत. हे लक्षात घेतल्यावर वैयक्तिक पातळीवर आपण किती प्लास्टिक वापरतो. ते बारकाईने पाहणे महत्त्वाचे ठरते. यालाच आपण आपल्या ‘प्लास्टिकच्या पाऊलखुणा’ म्हणतो. आपल्या जीवनशैली, आपले विचार, आर्थिक आणि सामाजिक स्तर, आपला वैज्ञानिक दृष्टिकोन या सार्‍यांवर आपली प्लास्टिक पाऊलखुणा अवलंबून आहे. अशाच प्रकारे कार्बनी पाउलखुणा (कार्बन फूटप्रिंट) आणि जल पाऊलखुणा (वॉटर फूटप्रिंट) हेदेखील पर्यावरण संवर्धनासाठी जबाबदार मापदंड आहेत.

एका वर्षांत एक व्यक्ती साधारण किती प्लास्टिकचा वापर करते, यावर त्या व्यक्तीचा ‘प्लास्टिक फूटप्रिंट’ ठरतो. हा लेख वाचल्यावर ‘प्लास्टिक फूटप्रिंट’ कमी करण्यास आपल्यात आपण थोडा तरी बदल करणे अपेक्षित आहे. कारण, आपल्याला रोजच्या जीवनात प्लास्टिकशिवाय जगणेच अशक्य झाले आहे. साधारण 50 वर्षांपूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण प्लास्टिकवर अवलंबून नव्हतो. भाजीबाजारात जाताना कापडी पिशव्या कटाक्षाने घेतल्या जात असत. एखाद्या दिवशी पिशवी नसेल, तर रुमालात किंवा साडीच्या पदरात भाजी बांधून आणली जात असे, हे हल्लीच्या मुलांना पटायचे नाही, कारण त्यांनी पुरुषी मोठे रुमालदेखील पाहिले नाहीत. टिश्यूपेपरच्या अवाजवी वापराने रुमालाला राम राम म्हटला. तसेच पदरदेखील काळाच्या आणि सोयीच्या रेट्यात हरवला.


विघटनशील कप, ग्लास, प्लेटी, बाटल्या या आता इतक्या सोयीच्या झाल्या की भांडी घासायला नको, पाणी वाचवणे, वेळ वाचवणे अशा अनेक समर्थनीय बाबी सांगून प्रचंड प्रमाणात प्लास्टिक, स्टायरोफोम आणि तत्सम साधनांच्या डिस्पोजेबल वस्तू भरमसाठ वापरल्या जाऊ लागल्या. पाण्याच्या बाटल्या या तर आता शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातील आवशक्यता झाली आहे. पूर्वीचे तांब्या-भांडे केव्हाच लोपले. निर्जंतुक असण्याच्या खुळ्या अट्टहासाने अगदी घरगुती वापरासदेखील ‘बिसलेरीच्या’ बाटल्या मागवल्या जातात. कोण पाहतंय यातल्या पाण्याचे आरोग्य? आपण सततच आपल्या पुढच्या पिढीची सर्व व्यवस्था करून ठेवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत असतो. पण, आपल्या पुढच्या पिढ्यांना कसे पर्यावरण देणार आहोत याचा कधी विचार करतो का? आपण वापरलेल्या प्लास्टिकपैकी केवळ पाच ते दहा टक्के प्लास्टिक पुन:चक्रीकरणासाठी धाडले जाते. उरलेले सर्व कसंही भिरकावून दिले जाते. यातले 30 टक्के भूमिभरण क्षेत्रात जाते आणि उरलेले एक तृतीयांश समुद्रात पोहोचते. प्लास्टिकचे नवे मानवनिर्मित खंड बनवण्याच्या प्रयत्नांत आपण आहोत. म्हणूनच आपला प्लास्टिक फूटप्रिंट तातडीने कमी करायला पाहिजे.


अन्यथा कर्करोग, अस्थमा, वंध्यत्व, मानसिक आजार अशा अनेक समस्यांना आपण आपल्याच वंशजांना तोंड द्यायला भाग पाडू. भाजीवाल्याकडे कोथिंबीर, मिरची, आले, लिंबू, गाजर, वेगवेगळ्या भाज्या घेताना निरनिराळ्या पिशव्या मागून घेणार्‍या बाया-बापड्यांनी हा विचार करावा. ज्यांना तुम्ही चांगलंचुंगलं रांधून घालणार आहात त्यांच्यासाठी प्लास्टिक पिशव्या नाकारणे, हे अतीव महत्त्वाचे नाही काय? प्लास्टिक पिशवी एक हजार वर्षे, बाटल्या 450 ते 500 वर्षे, डायपर्स 400 वर्षे, कप, प्लेटी- 400 वर्षे विघटित होत नाही, असे वैज्ञानिक अभ्यास म्हणतो. प्लास्टिकच्या पाऊलखुणा कशा मोजायच्या हे सविस्तर पुढील भागात पाहू.
- डॉ. नंदिनी देशमुख
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..