हमास समर्थक पत्रकार 'मेहदी हसन'च्या कार्यक्रमाचे प्रसारण रोखले!
15-Oct-2023
Total Views | 560
मुंबई : हमास आणि इस्त्रायलमधील युद्ध अजुनही सुरुच आहे. या युद्धात कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. इस्त्रायलने संपुर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी आपले सैन्य तैनात केले आहेत. यासाठी इस्त्रायलने आपल्या राखीव सैन्याला युद्धासाठी बोलवले आहे.
यातच आता अमेरिकन टीव्ही नेटवर्क एनबीसीने हमासचे समर्थन करणाऱ्या दोन टीव्ही अँकरचे शो बंद केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एनबीसी ग्रुपच्या टीव्ही चॅनल एमएसएनबीसीचे टीव्ही अँकर मेहदी हसन आणि अयमान मोहेल्दीन हे दोन्ही अँकर गेल्या अनेक दिवसांपासून हमासला पाठिंबा देत आहेत.
तसेच इस्रायलवर प्रश्नही उपस्थित करत आहेत. त्यामुळे त्यांचे शो टीव्हीवर प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अयमान मोहेल्दीन याला दुसरा शो करण्यास सांगण्यात आले आहे, तर मेहदी हसनचा शो प्रसारित केल्या गेला नाही.
परंतू, इस्रायल-गाझा युद्धाचा आणि त्या दोघांना टीव्ही शो मधून काढण्याचा काहीही संबंध नसल्याचे एनबीसीकडून सांगण्यात येत आहे. मेहदी हसन हा हमाससारख्या संघटनांना सातत्याने पाठिंबा देत आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या शो चे प्रसारण बंद करण्यात आले आहे.