"शिंदे सुरतला निघाले होते... पण आम्हाला वाटलं जर ऑपरेशन फेल झालं तर कसं व्हायचं?"

गिरीश महाजन यांनी सांगितला एकनाथ शिंदेंच्या बंडाचा किस्सा

    09-Jan-2023
Total Views | 71
 
Girish Mahajan
 
 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंड पुकारले, तेव्हा सत्तांतर कसं घडलं? यावर आत्तापर्यंत अनेक शिंदे गटातील नेत्यांनी किस्सा ऐकवला आहे. दरम्यान, आता जळगावात एका सभेला संबोधित करताना गिरीश महाजन यांनी सत्तांतराचा किस्सा ऐकवला. "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले, या गोष्टीचा विचार केला की आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र आम्ही ऑपरेशन सुरु केले. हे मिशन वाटते तितके सोप्पे नव्हते. उद्धव ठाकरेंना कंटाळून शिवसेनेसारख्या पक्षातून ४०-५० जण बाहेर पडले. आधी १७-१८ जणांना घेऊन बाहेर पडायचे ठरले, पण नंतर हा आकडा ५० वर गेला, हे खूप कठीण होते."
 
 
"एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतात की किमान ५ तास तरी झोपा. पण, ते पहाटे ३ वाजेपर्यंत काम करत असतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत. महाराष्ट्रातले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहेत. दुसरीकडे, आपण सर्वांनी बघीतले की अडीच वर्षात ते मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढले नाहीत. घरून काम करतो, कॉम्पुटरवर काम करतो, असेच काम त्यांनी केले." असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीकादेखील केली.
 
 
पुढे ते म्हणाले, "यासाठी चांमुंडा मातेचा आशीर्वाद आमच्यापाठी होता. ४० लोकं उद्धवजींना कंटाळून बाहेर पडताहेत हे सोपं नव्हतं. बुडाला लागलो तर समुद्राची लाट येते आणि ढकलून देते. अशीच लाट आली. ही लाट साधीसुधी नव्हती. तर लाट आली अन् थेट शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच बसवून दिलं. ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले." असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..