लेखक आणि त्याचं लेखन याची एक आगळीवेगळी अनुभूती देणारा 'लेखकाचा कुत्रा'

असंख्य नाट्यरसिकांच्या मनावर आपली छाप पाडणारी "लेखकाचा कुत्रा" ही दोन पात्रीय एकांकिका

    31-Jan-2023
Total Views |
लेखक विशाल कदम आणि डॉ. निलेश माने आणि प्रणव जोशी दिग्दर्शित 'लेखकाचा कुत्रा' ह्या एकांकिकेत प्रणव जोशी आणि निलेश माने ह्या दोन कलाकारांचे सादरीकरण आपल्याला नाटकाशी, अभिनयाशी, पात्राशी आणि विषयाशी धरून ठेवतात.
 

kutra 
नाटकाचा विषय आणि त्या विषयाच गांभीर्य एवढ्या सुंदर प्रकारे दाखवण्यात आलेल आहे की रसिकांना विचार करायला भाग पाडतं.
भूतकाळातील आणि वर्तमानातील लेखनामधे प्रसिद्धी आणि पैसा या दोन गोष्टी कशा गुंतत गेल्या याचं एक आगळंवेगळं समीकरण यामधे फार छान प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे.
रंगभूमीवर गाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या या सादरीकरणाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
▫️ नटराज करंडक बारामती
१. सांघिक प्रथम
२. दिग्दर्शन प्रथम
३. अभिनय प्रथम
४. अभिनय उत्तेजनार्थ
▫️राजर्षी शाहू महाराज करंडक
१. अभिनय उत्तेजनार्थ
▫️मनोरंजन मंडळ इचलकरंजी
१. सांघिक प्रथम
२. दिग्दर्शन प्रथम
३. अभिनय प्रथम
४. नेपथ्य प्रथम
▫️खासदार करंडक मुंबई
१. सांघिक प्रथम
२. दिग्दर्शन प्रथम
३. अभिनय प्रथम
४. नेपथ्य प्रथम
▫️महाकरंडक, अहमदनगर
१. सांघिक चतुर्थ
२. अभिनय प्रथम
३. सह अभिनय प्रथम
४. नेपथ्य द्वितीय
५. लेखन प्रथम
▫️स्नेहबंद पाजपंढरी
१. सांघिक प्रथम
२. दिग्दर्शन प्रथम
३. अभिनय प्रथम
४. लेखन प्रथम
 
तसेच मुंबई मधील मानाच्या सवाई अंतिम फेरीत
सवाई अभिनेता २०२२-२३ प्रणव जोशी ठरले.
एक आगळीवेगळी अनुभूती देणारा आणि कल्पना शक्तीला वेगळ्या प्रकारे विचार करायला लावणारे हे नाटक खरच बघण्यासारखे आहे. सर्वांनी आवर्जून एकदातरी ही एकांकिका पहावी.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.