मुंबई : माजी नगरसेवक दिवंगत नामदेव उबाळे यांचे घाटकोपर पूर्वेतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे सभागृह बांधून त्या सभागृहाला दिवंगत नामदेव उबाळे यांचे नाव देऊन सभागृह स्वरूपात स्मारक उभारू.त्यासाठी खासदार निधीतून 25 लाख रुपये निधीची तरतूद आपल्या खासदार निधीतून करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृह येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत नामदेव उबाळे यांच्या जाहिर श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते . यावेळी अध्यक्षस्थानी डी एम चव्हाण मामा तर सभेचे सूत्र संचालन चिंतामण गांगुर्डे यांनी केले.
यावेळी दिवंगत नामदेव उबाळे यांच्या पत्नी शिलाताई ; मुली आणि सर्व परिवार उपस्थित होते. लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सीद्धार्थ कासारे; श्रीकांत भालेराव; बापू जगधने; श्रीधर साळवे; बाळासाहेब गरुड; डॉ हरीश अहिरे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.माजी नगरसेवक दिवंगत नामदेव उबाळे लोकप्रिय समाजसेवक होते.लढाऊ निडर नेते होते.आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ होते.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असल्याचे सांगत ना.रामदास आठवले यांनी दिवंगत नामदेव उबाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.