मैत्री दिनानिमित्त निर्माते मनोज सांगळे आणि एम एस प्रॉडक्शन प्रस्तुत "आपली दोस्ती एक नंबर" गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल !
06-Aug-2022
Total Views | 328
मुंबई : हिंदी, पंजाबी प्रमाणेच मराठी संगीत क्षेत्रातही नवनवीन गाणी प्रदर्शित होऊन व्हायरल होताना दिसतात. आत्तापर्यंत दिलाची चोरी, कारभारी, रिमझिम, माझं हृदय अशी जवळपास १२ मराठी गाण्यांची निर्मिती करणारा निर्माता मनोज सांगळे मैत्रीदिनाच्या निमित्ताने घेऊन येत आहे, 'आपली दोस्ती एक नंबर' हे गाणं! हे गाणं नुकतचं 'एम एस प्रॉडक्शन'वर प्रदर्शित झालं आहे. एम एस प्रॉडक्शन आणि डि जी. फिल्म प्रॉडक्शन एकत्र काम करत आहेत. काही क्षणातच या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
निर्माते मनोज सांगळे गाण्याविषयी सांगतात,"हे गाणं म्हणजे माझ्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट आहे. कॉलेजमध्ये असताना मी ठरवलं होतं की मैत्री हा विषय घेऊन एक सुंदर गाणं करायचं. मैत्री हे एक असं नातं आहे जे रक्ताच्या ही पलिकडे असतं. मैत्री करताना आपण वर नाही बघतं, तसंच जात पात देखिल पाहत नाही. हेच या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं मी एम एस प्रॉडक्शनच्या संपूर्ण टीमला आणि माझा खास मित्र अविनाश सोनावणे यांना समर्पित करतो.'
'आपली दोस्ती एक नंबर' या गाण्याचे गीतकार प्रशांत तिडके आहे तर संगीतकार सौरभ मस्तोलीने या गाण्याचे संगीत केले आहे. तर गायक ऋषिकेश शेलार आणि गायिका स्नेहा महाडिक हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात ऋषिकेश तिकोणे, जगदीश निकम, मिकी झेहेन, मनोज सांगळे, तनू भोसले, शिवानी कांबळे, आरती थोरवे, साहिल दराडे, ऋतुजा मुसळे आणि शरद जोपले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मीडियावर फ्रेन्डशिप डे निमित्ताने सर्वत्र 'आपली दोस्ती एक नंबर' या गाण्याची चर्चा आहे.