मुंबई : 'लालसिंग चड्ढा' सिनेमामुळे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या भलताच चर्चेत आहे. करिना कपूर आणि आमिर खानचा हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. हॉलीवूड सुपरस्टार टॉम हॅंक्सच्या 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचा हा अधिकृत रीमेक आहे, तर हा सिनेमा आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून तो या सिनेमाला सुपरहिट करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. पण त्यादरम्यानच आमिरच्या या सिनेमाला बॉयकॉट करण्याच्या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे.
ट्वीटरवर लालसिंग चड्ढाचे 'बॉयकॉट' हॅशटॅग जोरदार ट्रेंडिंगमध्ये आहे. यामुळे आता अभिनेता मिलिंद सोमण आमिर खानला पाठिंबा देत आहे. मिलिंद सोमणने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करत म्हटलं आहे की, ''ट्रोलर्स एका चांगल्या सिनेमाचं काही बिघडवू शकत नाहीत'', मिलिंदच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की,'मिलिंद जर तुला सिनेमाचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर विरोधाला विनम्रतेनं सामोरं जा. करिनासारखा अहंकार दाखवू नको. प्रेक्षकांना आव्हान नको देऊस. कमीत कमी आमिरनं बॉयकॉटची मागणी जोर धरल्यानंतर विनम्रतेने प्रेक्षकांना आवाहन केलं आणि आपली हुशारी दाखवली'.
खरंतर ही नाराजगी आमिरची पूर्वीची बायको किरण राव हिच्या काही वर्षांपूर्वी, भारतात सुरक्षित वाटत नाही, या वक्तव्यामुळे आहे. आमिर ने हे म्हटलेच नव्हते आणि जिने म्हटले होते आता ती त्याची आता बायकोही राहिली नाही. पण लोकांनी ते लक्षात ठेऊन मात्र नाराजीचे जोरदार प्रदर्शन केले आहे. आमिरनं यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ''खूप जण म्हणत आहेत की भारत मला आवडत नाही, पण खरंतर माझं माझ्या देशावर, भारतावर खूप प्रेम आहे. तेव्हा कृपा करुन माझ्या सिनेमावर बहिष्कार घालू नका.''