चित्रपटांच्या वादात आता मधुबाला यांचा बायोपिक!

    06-Aug-2022
Total Views | 58
 
 
madhubala
 
 
 
मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये चित्रपटांपेक्षा अधिक 'वाद' चालतात. आता पुन्हा एक वाद पेटण्याची शक्यता आहे. दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांचा बायोपिक हा सध्या वादाचा विषय आहे. कारण त्यांच्या जीवनावर चित्रपट यावा अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा नाही. म्हणून मधुबाला यांची बहिण मधुर भूषण मधुबाला यांच्या बायोपिकला नकार देत आहेत, त्यामुळे आता आता सिनेमाचे निर्माते पद्मिनी कोल्हापुरे यांचे पती टुटू शर्मा आणि मधुर भूषण यांच्यात खडाजंगी सुरु आहे.
 
 
मधुबाला यांच्यावरील 'मधुबाला- दर्द का सफर' या पुस्तकाचे राइट्स शर्मा यांनी आपल्या नावावर करुन घेतले आहेत. बायोपिकवरनं विरोध सुरु असला तरी निर्माते अद्याप तरी आपल्या विचारांवर ठाम आहेत.
 
 
काही दिवसांपूर्वी मधुर भूषण यांनी स्पष्ट शब्दात म्हटले होते की, ''कुणीही माझ्या परवानगीशिवाय मधुबालाच्या आयुष्यावर सिनेमा काढू शकत नाही''. त्यांनी एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना सांगितले होते की, ''जर लोकांनी माझ्या विनंतीचा मान ठेवला नाही तर माझ्याकडे त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. मधुबाला ही आमच्या माझ्या जिवाभावाचा विषय आहे. आमच्या भावनांना जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्या विरोधात कारवाई करु. जो कोणी मधुबालावर माझ्या परवानगीशिवाय बायोपिक काढेल त्याला मी कोर्टात खेचीन. मी शेवटपर्यंत या विरोधात लढा देईन''.
 
 
 

madhubala 
 
 
 
पण या संदर्भात मधुबाला यांच्यावर बायोपिक काढणाऱ्या टुटू शर्मा म्हणाले, ''मधुबाला यांचा बायोपिक काढण्याच्या तयारीत मी आहे, 'मधुबाला-दर्द का सफर' या पुस्तकावर आधारित माझा सिनेमा असणार आहे. मधुबाला- दर्द का सफर हे पुस्तक सुशिला कुमारी यांनी खूप वर्षांपूर्वी लिहिलं आहे. मधुबाला या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, लोकांचे त्यांच्यावर आजही तेवढेच प्रेम आहे आणि लोकांपर्यंत त्यांची लाइफस्टोरी पोहोचायला हवी. मला जेवढा कायदा माहितीय त्यानुसार कोणीही पब्लिक फिगरवर आपला वैयक्तिक हक्क सांगू शकत नाही ,अगदी त्यांचे कुटुंबिय देखील. आपल्याकडे इतके बायोपिक बनले आहेत पण कोणीच अशा पद्धतीनं विरोध केलेला नाही. पण जसं मधुबाला यांच्या बायोपिकला विरोध केला जातोय त्यामुळे मी देखील यासंदर्भात माझ्या लीगल टीमशी संपर्कात आहे''.
 
 
 
''मधुबाला यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी कोणाही त्यांच्या परिचित व्यक्तिशी संपर्क साधलेला नाही. मी जे काही करणार आहे ते संपूर्ण त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाच्या आधारे. आणि पुस्तक हे मधुबाला यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं कथन करतो. बघूया, यामध्ये कोण जिंकतंय''.
 
 
 
 
मधुबाला यांची बहिण मधुर भूषण विरोधात टुटू शर्मा हा वाद जोरदार पेट घेईल सध्या असंच वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच असेही सांगण्यात येत आहे की मधुबाला यांच्यावरील बायोपिकचे शूट टूटू शर्मा याच वर्षीपासून सुरू करणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121