मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा मुक्काम आता देवगिरी बंगल्यावर असणार आहे. राज्यातील शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. आता पर्यंत सामान्यपणे सर्वच विरोधी पक्षनेत्यांच्या मुक्काम हा याच देवगिरी बंगल्यावरच राहिला आहे. त्यामुळे आता नव्या विरोधीपक्षनेत्यांचा मुक्कामही याच बंगल्यावर असणार आहे. राज्यातील सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढून हा निर्णय घेतला आहे.