महाराष्ट्र राज्याची स्थापना दि. १ मे, १९६० रोजी झाल्यानंतर राज्याची औद्योगिक प्रगती तथा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात औद्योगिक वसाहती उभारण्याचा विचार सुरू झाला. त्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’ची स्थापना दि. १ ऑगस्ट, १९६२ रोजी करण्यात आली. ‘एमआयडीसी’चा मुख्य उद्देश महाराष्ट्रात औद्योगिक वसाहती उभारून त्या वसाहतीत मूलतः व्यवस्था म्हणजे पाणी, वीजपुरवठा तसेच रस्ते व त्याबरोबर औद्योगिक सांडपाणी निचरा इत्यादी व्यवस्था करून देणे असेच राहिले.
सदर धोरण राबविताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी औद्योगिक वसाहतींचे जाळे विणळे गेले. १९६८ मध्ये कल्याण-डोंबिवली ही वसाहत उभी करण्यात आली. साधारणतः नवे उद्योजक जे महाराष्ट्र किंवा इतर प्रांतातून उच्च शिक्षण घेऊन सदर वसाहतीत नवा उद्योग करण्यासाठी पुढे सरसावले. तत्कालीन शासनाने हे नवे उद्योजक तथा काही अर्थात यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देत कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ परिसरात निरनिराळे उद्योग म्हणजेच रासायनिक, इंजिनिअरिंग, कपडा, इतर पूरक उद्योग सुरू करण्यात प्रारंभीची मदत देण्यात आली. उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन नवउद्योजक उत्पादनाच्या क्षेत्रात आले खरे. परंतु,त्यांच्या असे ध्यानात आले की, या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात सोईसुविधांचा अभाव आहे. सरकार दरबारी एखादा उद्योजक आपली सोईसुविधांअभावी होणारी घालमेल सरकार समोर मांडण्यात अयशस्वी किंवा सरकारकडून काम करून घेण्यास कमी पडू लागला, तेव्हा सर्व उद्योजकांच्या असे लक्षात आले की, जर आपली एखादी संघटना असेल, तर आपण आपल्या एकजुटीद्वारे सरकारवर दबाब टाकून आपले म्हणणे मांडू शकतो व आपले कामे लवकर करण्यासाठी ही संघटना उपयोगी ठरेल. त्यातूनच ‘कल्याण-अंबरनाथ ‘मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन’चा जन्म ७ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.
आजमितीस या संघटनेला ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीपासून ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंगअसोसिएशन’ उद्योगांना असणार्या समस्या म्हणजेच वीज, पाणी, कामगारांची उपलब्धता, रस्ते/दळणवळण व कायदेशीर परवानग्या मुख्यत्वे औद्योगिक सुरक्षा विभाग-प्रदूषण नियंत्रण मंडळ कामगार विभाग तथा इतर शासकीय आस्थापने म्हणजेच (एमआयडीसी /बॉयल) कडोंमपा यांच्याशी सतत संवाद ठेवून उद्योग कसे पुढे जातील व सरकारच्या कायद्यान्वयेच उद्योग चालवण्यात येतील, याची काळजी घेण्यात आली. संघटनेस हे सर्व करत असताना बर्याच ठिकाणी कायद्यांमधील त्रुटी, अडचणी जाणवू लागल्या व त्या अनुषंगाने सरकार दरबारी आपले म्हणणे मांडून कायद्यात सुव्यवस्था आणण्यात संघटनेतर्फे हातभार लावण्यात आला.
औद्योगिक संघटना स्थापन झाल्यानंतर संघटनेने सरकार दरबारी पाठपुरावा करून संघटनेसाठी वास्तू मिळविण्यात यश आले. आज ती वास्तू दिमाखदार स्वरूपात उभी आहे. औद्योगिक संघटनेचा पूर्ण कारभार या वास्तूमधूनच चालतो.सरकारची उद्योगांबद्दलची धारणा किंवा मुक्त औद्योगिक धोरणाकडे वाटचाल सुरू झाली, तसे महाराष्ट्रातील उद्योग भरभराटीस येऊ लागले. त्यात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. जसे उद्योग वाढले तसे उद्योगाच्या आजूबाजूला प्रथम कामगार वस्ती व नंतर इतर नागरी वस्ती वाढू लागली. प्रथम मुख्य शहरापासून साधारणतः चार किमी दूर असलेला औद्योगिक परिसर हा आता नागरी वस्तीच्या मध्यावर आला. हे सर्व नागरीकरण करत बेकायदेशीर नागरी वसाहती वाढू देण्यात एका अर्थाने मदतच केली. या वाढलेल्या वसाहतींचा त्रास नागरी वस्ती व उद्योजक या दोघांनाही होऊ लागला. कुठलाही उद्योजक आपली उत्पादन क्षमता सुस्थितीत आणण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नवनवीन शास्त्रीय उत्पादनाचा वापर आपल्या कारखान्यात करत असतो व आपला कारखाना वाढवतो. हे करण्यासाठी त्याला नव्या परवानग्या सरकारकडून घ्याव्या लागतात. परंतु, या बेकायदेशीरपणेवाढलेल्या नागरी वस्त्यांमुळे त्या औद्योगिक वसाहतीची परवाने नियम बदलले जाते व त्यामुळे आपला कारखाना अद्ययावत किंवा उत्पादन क्षमता वाढवण्याची इच्छा असूनसुद्धा प्रचंड अडचणी उद्योजकासमोर उभ्या राहतात. ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’या अडचणींवर मात करण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी वर्तमानपत्रे/इलेक्ट्रानिक माध्यमांद्वारे आपले म्हणणे मांडून उद्योजगता वाढीस हातभार लावते, जेणेकरून उद्योग वाढला, तरच देशाची प्रगती होईल, हे तो व्यवस्थितरित्या जाणतो.
‘कामा’ अंतर्गत ‘एमआयडीसी’च्यासंयोगाने १९९९ सालापासून ‘डीसीइटीपी’ व ‘डीबेसा’ असे १६.५ एमएलडी औद्योगिक सांडपाणी केंद्र अस्तित्वात असून वारंवार त्यांचे आधुनिकीकरण केले जाते. सध्या दोन्ही औद्योगिक सांडपाणी केंद्र पुन्हा आधुनिकतेच्या मार्गावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर २६.५ दशलक्ष घनफूट औद्योगिक सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया करून कल्याण खाडीत बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडण्यात येणार आहेत. बंदिस्त पाईपलाईन खाडीत सात किलोमीटरपर्यंतआतमध्ये जोडणीचे काम ‘एमआयडीसी’तर्फे सुरु आहे, जेणेकरून कल्याण-डोंबिवलीची जलप्रदूषणाची समस्या पूर्णपणे सुटणार आहे. वायूप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी ‘कामा’ संघटना पुढाकार घेऊन स्वच्छ इंधन वापरण्यासाठी आपल्या सभासदांचे सातत्याने प्रबोधन करत आहे व त्यास यशही मिळत आहे. त्याचबरोबर ‘कामा’ संघटना हेही जाणते की, सुरक्षित व कुशल कामगार कुठल्याही उद्योगवाढीचा मूळ स्रोत असतो. कामगार सुरक्षित तर कारखाना सुरक्षित व त्यासाठी ‘कामा’ त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वास्तूंमध्ये वेल्डिंग/कटिंग/रसायने हाताळणे इत्यादी गोष्टींवर कार्यशाळा घेत असते. उद्योगातील प्रावीण्य मिळालेले सभासद आपले कौशल्य खालील स्तरातील कामगारांपर्यंत पोहोचविण्यात हातभार लावतात.
उद्योग चालविताना सर्व प्रकारची काळजी घेतल्यावरसुद्धा मानवी चुकीमुळे अपघात घडतात. असे अपघात आपण टाळू शकतो किंवा असे अपघात झाल्यास त्याची व्याप्ती कमी करू शकतो, हे ‘कामा’ संघटनेच्या लक्षात आल्यावर त्यांना ‘उद्योगाचे परस्पर साहाय्यता गट’ तथा ‘मार्ग’ची कल्याण-डोंबिवली विभागात स्थापना करण्यात आली व गेल्या २५ वर्षांपासून ‘कामा’ अंतर्गत ‘मार्ग’ हा कल्याण-डोंबिवली विभागात कार्यरत आहे. कामगारांना विविध विषयांवर म्हणजे धोकादायक रसायने हाताळणे, उंचीवर काम करणे, अग्नी प्रतिबंधक उपकरणे हाताळणे, रासायनिक प्रक्रियेतील धोके इत्यादी विषयांवर त्या त्या विषयांतील तज्ज्ञांमार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. आजपर्यंत साधारणतः पाच हजारांच्यावर कामगारांनी या कार्यशाळांचा लाभ घेतला आहे व त्याचा परिणामसुद्धा अपघात कमी होण्याच्या प्रमाणातून सिद्ध होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे‘कामा’ संघटना पर्यावरणीय बदल रोखण्यासाठी व पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी सतत कार्यशील असते.वृक्षारोपण, एकल वापर प्लास्टिकबंदी जनजागृती मोहीम ,औद्योगिक सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था, तसा परिसरातून वाहणारा नाला याची दक्षता ठेवण्यासाठी ‘एमपीसीबी’ व ‘एमआयडीसी’ यांच्याबरोबर संयुक्तपणे ‘दक्षता समिती’त सहभाग घेऊन वारंवार पाहणी करण्यात येते.
आजूबाजूच्या परिसरातील शाळांमध्ये शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले जाते.
कोरोना महामारीच्या काळात शासनास कल्याण- डोंबिवली विभागातून साधारणत: ११ कोटी रुपयांच्या वैद्यकीय वस्तूंद्वारे मदत करण्यात आली. तसेच, साधारणत: रोज अंदाजे ५०० घरांना तीन महिने दुपारचे जेवण देण्यात आले.साधारणत: ५० हजार कामगार व त्यांचे कुटुंबीय व इतर पूरक व्यवस्था म्हणजे पाच लाखांच्यावर लोकांसाठी रोजगार या संघटनेच्या सभासदांतर्फे उपलब्ध करून दिला जातो.‘कामा’ संघटनेने औद्योेगिक अपघातात त्वरित मदत मिळविण्याकरिता आपत्कालीन कक्षाची स्थापना करून ते पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आपत्कालीन वाहनाची जुळवाजुळव केली आहे. सदर आपत्कालीन वाहन निरनिराळ्या आपत्कालीन परिस्थितीतून उपयोगी असण्यार्या कीटसह अत्याधुनिक करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत हे आपात्कालीन वाहन उद्योगासाठी समर्पित करण्यात येणार आहे.
हे सर्व करण्यासाठी १९६८पासून असलेल्या कार्यकारिणी आपल्या कार्यकाळात उत्तमरित्या कार्य करून उपलब्धता वाढविण्यात मदत करत आल्या आहेत. सहकार्यकारिणीत देवेन सोनी यांच्या नेतृत्वाखाली विविध उद्योगपती व समाजयोगी कार्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात.
- देवेन सोनी
(लेखक ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.)
‘कामा’ संस्थेचे पदाधिकारी : डॉ. राजू बैलुर, डॉ. उदय वालावलकर, डॉ. कमल कपूर, डॉ. जयवंत सावंत, डॉ.निखिल धुत, आदित्य नाकेर, श्रीकांत जोशी.